बारामती मधील युवकाने घेतली थेट राष्ट्रपतींकडे धाव…!


कॉन्ट्रॅक्टर खत्रीवर फौजदारी वसुलपात्र गुन्हा व त्याला मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या संपत्तीची चौकशी करण्याची मागणी….

बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज

बारामती तालुक्यातील ढाकाळे ग्रामपंचायत हद्दीतील खामगळवाडी येथील बेकायदेशीर उत्खनन बंद करा अन्यथा घंटानाद आंदोलन करण्याचा ईशारा पणदरे येथील माहिती अधिकार कार्यकर्ते विक्रम कोकरे यांनी दिला आहे.विक्रम कोकरे यांनी भारताचे मा.राष्ट्रपती,मा. पंतप्रधान,महसूलमंत्री बाळासाहेब थोरात,सचिव महसुल विभाग,उपविभागीय अधिकारी बारामती यांना निवेदन देण्यात आले आहे.याबाबत विक्रम कोकरे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वारंवार लेखी तक्रार तसेच फोनव्दारे व समक्ष भेटून देवून देखील संबंधीत प्रशासनाने या बेकायदेशीर गौणखनिज उत्खननास पाठींबा दिलेला आहे.


तलाठी ढाकाळे (खामगळवाडी) व लोणीभापकर सर्कल यांनी तक्रार केल्यानंतर १५ दिवसांनी पंचनामा कला त्या पंचनाम्या मध्ये बेकायदेशीरपणे गौणखनिज उपसा २८ हजार ब्रास केल्याचे निदर्शनास आले.तरी देखील संबंधीत तहसिलदार यांनी कायदेशीर कारवाई करणे तात्काळ अपेक्षीत असताना देखील त्यांनी कोणतेही ठोस अशी कारवाई केलेली नाही उलट त्या गौणखनिज उत्खनन करणाच्या खत्री कन्स्ट्रक्शन त्यापेक्षाही मोठया प्रमाणात उच्छाद मांडला.यावरून असे निदर्शनास येते की,संबंधीत अधिकारी यांचे आर्थिक हित जोपासण्याचे काम तर चालू ना ? शासनाचा कोटयावधी रुपयांचा महसूल बुडवून संबंधीत व्यक्ती ही बेकायदेशीरपणे मालमत्ता कमवित आहे.

त्याचबरोबर त्या व्यक्तीची व संबंधीत अधिकारी यांची
सी.बी.आय.मार्फत कमविलेल्या संपत्तीची व संबंधीत अधिकारी
यांची खातेनिहाय सखोल चौकशी करून शासनाचे होणारे नुकसान टाळावे व संबंधीत गौणखनिज उत्खनन करणारे ठेकेदार यांच्यावर फौजदारी वसुलपात्र गुन्हे दाखल करून शासनाचा नियमाचा भंग केल्याने त्यांच्यावर देखील कडक कारवाई करावी.अशाच प्रकारे दुसऱ्या ठिकाणी खामगळवाडी ग.नं.४६ मध्ये देखील मंजूरी देवून गट नं.४७ मध्ये बेकायदेशीर पणे अवैध गौणखनिजाचा उपसा केलेला आहे.त्यावर देखील इटीएस मोजणी होवून कारवाई व्हावी.संबंधीत प्रकरणात आमच्या जिवीतास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.तरीही आम्ही लोकशाही मार्गाने देश हितासाठी कोटयावधी रूपये चोरी होत असणारी शासनास मिळवून देत आहोत.तरीही शासन गांभीर्याने दखल घेवून उचीत कारवाई करीत नाही.त्यामुळे संबंधीत खाणीमध्ये आमी असंख्य युवक कार्यकत्यांसह एक दिवशीय घंटानाद आंदोलन करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *