स्वतः ला शिवभक्त म्हणवून घेतोस तर मग,मुलींना फसवून लॉजवर कशाला नेतोस ???
जुन्नर : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज
जुन्नरचे माजी नगरसेवक आणि शहा एचपी गॅस वितरक रुपेश शहा यांच्याकडून खंडणी मागितल्या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ता आणि शिवऋण संस्थेचा संस्थापक अध्यक्ष अक्षय बो-हाडे याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.हे प्रकरण ताजं असतानाच आता अक्षय बो-हाडेच्या अडचणी वाढवणारी आणखी एक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे अक्षयची पत्नी रुपाली बो-हाडे यांनी पती अक्षय याच्यावर गंभीर आरोप केले आहेत.पोलिसांनी या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन रुपाली बो-हाडे यांचे पती अक्षय व त्याच्या कुटुंबियां विरोधात जुन्नर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल भादवी कलम ४९८ (अ),४२०,४०६,३२४,३२३,५०४,५०६,३४ शस्त्र आधिनियम २५ (अ) अन्वये गुन्हे दाखल केले आहेत.
अक्षय,त्याची आई सविता बो-हाडे,दीर अनिकेत बोऱ्हाडे
यांनी आपला प्रचंड छळ केल्याचा आरोप रुपाली बोऱ्हाडे यांनी केला आहे.सासरच्यांनी हाताने आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.तसेच वेळोवेळी रिव्हॉल्वर आणि गुंडांचा धाक दाखवून शारीरिक आणि मानसिक त्रास दिला.कोणतेही काम न करता शिवऋण संस्थेतून आलेल्या निधीचा वापर स्वत:च्या चैनीसाठी केला.तसेच त्याने अनेक मुलींसोबत अनैतिक संबंध ठेवत फसवणूक केली असल्याचा आरोप देखील अक्षयची पत्नी रुपाली हिने केला आहे.तसेच अक्षयसोबत सोशल मीडियावर आपली मैत्री झाली असल्याचा दावा रुपाली यांनी केला.आपली पहिली भेट कधी झाली तेव्हापासून ते आता पर्यंतच्या सविस्तर घडामोडी सांगितल्या आहेत.रुपाली यांची अक्षयसोबत चर्चा वर्षांपूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून भेट झाली होती, त्यावेळी रुपाली या कल्याणमध्ये एका कॉलेजात शिक्षण घेत होत्या.अक्षयनेच आपल्याला लग्नाची मागणी घातलेली,असंही रुपाली यांनी सांगितलं.
अक्षय हा रस्त्यावरील किंवा फुटपाथवरील अपंगाची सेवा करतो,असं आपल्याला सोशल मीडियाद्वारे विविध व्हिडीओमधून समजलं.कल्याण रेल्वे स्थानकावर एक अपंग महिला बघितली.त्याबाबत आपण फेसबुकद्वारे अक्षयसोबत संपर्क करुन माहिती दिली. त्यावेळी अक्षयने कल्याणला जेव्हा येऊ तेव्हा त्यांना घेऊन जाऊ,असं सांगितलं.याच मुद्द्यावरुन एकमेकांचे नंबर शेअर करण्यात आले,त्यातून दोघांमध्ये बातचीत सुरु झाली आणि काही दिवसांनी अक्षयने आपल्याला प्रपोज केलं,असं रुपाली यांनी सांगितलं आहे.काही लोकं जागेवर घाण करत,ज्यांना गंभीर आजार आहे किंवा ते
दुसऱ्यांना मारहाण करतात अशा लोकांना अक्षय हा रात्रीचा घेऊन जायचा.त्यानंतर तो त्यांना कुठेही सोडायचा.तो त्यांना कुठे सोडायचा हे माहिती नाही. माझ्या सोबत अन्याय झाला आहे,पण तो छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन लोकांना फसवत आहे तो जे बोलतो त्याच्यावर विश्वास न ठेवता खरी सत्यता काय ते तपासावं.मी पोलिसात याबाबत तक्रार केली आहे.तसेच माझ्यावर कुणाचाही दबाव नाही असं देखील रुपाली म्हणाल्या.