BIG BREAKING | बारामती तालुक्यातील धक्कादायक प्रकार; ब्लॅकमेल करत मुलीवर लैंगिक अत्याचार…


बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

दहावीत असल्यापासून एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करत ती पुढील शिक्षणासाठी गेली असताना शरीरसुखाची मागणी करण्यात आली.तिने याकरिता नकार दिला असता तिचे खासगी फोटो तिच्या आई आणि बहिणीला पाठवण्याची धमकी दिल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.विश्वराज प्रताप गायकवाड (रा.करंजेपूल,ता.बारामती) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.त्याच्या विरोधात विनयभंग, शारिरिक अत्याचारासह पोकसो कायद्यान्वये वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आलाय..

वडगाव निंबाळकर पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार,१० मार्च २०२२ ते ३० मार्च २०२५ या कालावधीत हा प्रकार घडला असून,फिर्यादी ही २०२२ मध्ये सोमेश्वरनगरला दहावीत शिक्षण घेत असताना गायकवाड याने तिच्याशी जबरदस्तीने मैत्री केली.ती शिकवणी वर्गाला जात असताना १० मार्च २०२२ रोजी सायंकाळी चारच्या सुमारास त्याने तिला अडवले. तु मला खुप आवडते,माझे तुझ्यावर खुप प्रेम आहे,असे तो म्हणाला.फिर्यादीने त्यास नकार दिला. १२ मार्च २०२२ रोजी त्याने तिला काॅफी पिण्यासाठी चल असे म्हणत जबरदस्तीने स्कूटीवर बसवले. निरा-लोणंद रस्त्यावरील एका लाॅजवर तिला नेत तेथे तिच्या इच्छेविरुद्ध दोनदा तिच्याशी शरीरसंबंध ठेवले.

याबद्दलची वाच्यता करू नको अशी धमकी देत तिला करंजेपूल येथे आणून सोडले. त्यानंतर पुन्हा दोन दिवसांनी त्याच लाॅजवर तिला नेत तिच्याशी शरीरसंबंध प्रस्तापित केले. ती अकरावी विज्ञान शाखेत शिकत असताना महाविद्यालयाच्या स्नेहसंमेलना वेळी त्याने त्याच्या मोबाईलमध्ये दोघांचे एकत्रित फोटो काढले. तसेच २०२४-२५ मध्ये ती नीट परीक्षेच्या अभ्यासाठी लातूर येथे गेली असताना त्याने तिच्या मोबाईलवर संपर्क साधत शरीरसुखाची मागणी केली.फिर्यादीने त्याला नकार दिला. त्यावर त्याने आपण लाॅजवर गेलो असताना तुझे नग्न फोटो मी काढले असून तु मला भेटली नाहीस तर मी ते व्हायरल करेन अशी धमकी दिली.

तिच्या खोलीत राहणाऱ्या मैत्रिणीकडेही त्याने चौकशी केली. त्यानंतर तिची बहिण व आई या दोघींच्या मोबाईलवर त्याने फोटो पाठवले असल्याचे फिर्यादीने फिर्यादीत नमूद केले आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक राहूल साबळे हे करीत आहेत..


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *