बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क..
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार शुक्रवारी (ता.29) बारामतीच्या दौऱ्यावर होते.यावेळी त्यांनी विविध कार्यक्रमाला हजेरी लावली.यावेळी माळेगाव येथे कार्यक्रमादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांने आपल्या जमिनीच्या नोंदीसाठी एक तलाठी तब्बल 15 हजार मागत असल्याची तक्रार केली होती,आणि त्यानुसार अजित दादांनी मेहता हॉस्पिटल येथील कार्यक्रमात या गोष्टीचा उल्लेख करत मी बारामतीसाठी चांगले अधिकारी कर्मचारी आणत असतो,मात्र जर असे कर्मचारी करत असतील तर त्याचा बंदोबस्त करतो म्हणत त्या लाचखोर तलाठी महाशयांना एमआयडीसी येथील गेस्ट हाऊस बोलवून चांगलाच दम भरल्याची माहीती मिळत आहे..
मात्र अजित दादांनी अशा लाचखोर तलाठी महोदयांवर कारवाई करण्याचे निर्देश द्यावेत अशी मागणी आता बारामतीकरांकडून होत आहे,मात्र हया लाचीसाठी केवळ तलाठी महोदय एकटेच जबाबदार आहेत का ? असा सवाल देखील यानिमित्ताने उपस्थित केला जातोय..अशा लाचखोर तलाठी महोदयांवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात यावा आणि याची सखील करण्यात यावी अशी मागणी देखील बारामतीकरांकडून केली जाऊ लागली आहे..हे लाचखोर तलाठी महाशय मात्र चांगली मोहमाया जमवत असल्याची माहिती आता समोर येत आहे.
बारामती तालुक्यातील अवैधरित्या सुरू असलेल्या वाळू तस्करांकडून कार्ड स्वरूपात मोठ्या प्रमाणावर मलिदा गोळा करण्याचे काम हे तलाठी महोदय करीत असल्याची माहिती प्रशासकीय भवनातील एका कर्मचाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली आहे. यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी अशा लाचखोर कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त करणे गरजेचे असून,जेणेकरून इतर शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्यावर जरब बसेल, कोणतेही शासकीय काम करण्यासाठी पुन्हा लोकांकडून पैसे मागण्याची हिम्मत होणार नाही ? यामुळे अशा लाचखोर तलाठी महाशयांवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात यावा आणि याची सखोल चौकशी करण्यात यावी जेणेकरून या सगळ्या प्रकरणातील मास्टर माइंड समोर येतील..
जर अशा लाचखोर कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल होणार नसेल तर मग सर्वसामान्यांना वेगळा न्याय आणि शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना वेगळा न्याय हीच कायद्यासमोर समानता आहे का ? असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जातोय..