BIG NEWS | बारामती मधील अनाधिकृत वीट भट्टयांना तहसीदारांची परवानगीच नाही; विटभटयावर कार्यवाहीचे आदेश…


तलाठी,मंडल अधिकारी याची जिल्हा बदली करण्याची मागणी..

बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

बारामती तालुक्यातील आणि शहर हद्दीत सुरू असलेल्या अनाधिकृत वीट भट्ट्या तात्काळ बंद करून महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ अन्वये कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते भास्कर दामोदरे यांनी प्रांताधिकारी यांच्याकडे केली होती, आणि याच मागणीची दखल प्रांताधिकार्‍यांकडून घेण्यात आलीये..तहसीलदार यांना आदेश करून कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.

प्रांताधिकारी यांनी तहसीलदार यांना कार्यवाही करण्याचे आदेश दिल्याने बेकायदा वीट भट्टी चालवीत असणारांची धावपळ सुरु झाली असून शिल्लक माल विकण्यात भट्टी चालक मशगुल आहेत.त्यामुळे प्रशासनाने वेळीच कार्यवाही करण्याची अपेक्षा नागरिकांकडून होत आहे. बारामती आणि परिसरात १२७ अनाधिकृत विटभटया यांना आपल्या कार्यालयातून व प्रदुषण नियामक मंडळ यांनी कसल्याही प्रकारची परवानगी देलेली नसताना या विटभट्या अनेक वर्षा पासून राजरोस पणे सुरूच आहेत या विटभट्या गावचे तलाठी,मंडळ अधिकारी यांच्या संगनमताने आर्थिक देवाणघेवाण करून राजरोसपणे सुरू आहेत.

अशा वीटभट्टी धारकांना पाठीशी घालणाऱ्या तलाठी, मंडल अधिकारी यांची खातेनिहाय चौकशी करून संबधितांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी देखील केली आहे.तर विटभटयासाठी लागणारी माती जिल्ह्या सीमाच्या बाहेरून आणून तसेच विटभटयासाठी लागणाऱ्या मातीचा साठा केला जात आहे.तसेच त्या मातीची अनधिकृतपणे वाहतूक देखील केली जात आहे. हे सर्व शासनाचा महसूल बुडऊन केले जात आहे. ज्याठिकाणी या वीट भट्ट्या सुरु आहेत,त्या विटभटया चालकांच्या जमिनीवर शासकीय बोजा चढवण्याची मागणी देखील दामोदरे यांनी निवेदनाद्वारे केली आहे. बारामती शहर आणि तालुक्यात शासकीय आकड्या नुसार साधारण सव्वाशेच्या आसपास कार्यरत वीटभट्टी आहेत..

संपूर्ण तालुक्यात सध्या झपाट्याने होत असलेला विकास तसेच नागरीकरण आणि बांधकाम याचा विचार करता या धंद्यातून एकट्या बारामतीत हजारो कोटींचे चलनी व्यवहार होतो आहे मात्र तो सर्व व्यवहार बेकायदा आणि रोखीने होत असल्याने आणि शासकीय दुर्लक्ष असल्याने मोठ्या प्रमाणात शासनाचा कर बुडवून केला जात आहे. वीट भट्टीचा कच्चा माल,माती आणि विटा वाहतूक करीत असताना ती सुरक्षेच्या दृष्टीने झाकलेली असावीत मात्र भर दिवसा ती वाहतूक राजरोसपणे उघडी ठेवून वाहतूक केली जात आहे.तसेच अस्तित्वात असलेल्या वीट भट्टी पासून कमीत कमी एक किलोमीटर अंतरावर असावी,तसेच भट्टीला मान्यता प्राप्त इंधन वापरावे,तिला चिमणीची उंची ठरवून दिली आहे, वस्ती फळबागा यांच्यापासून अतरावर असावी असे एक ना अनेक नियम धाब्यावर बसवून वीट भट्ट्या सुरु आहेत. सध्यातरी या प्रकरणावर शासकीय यंत्रणा हलताना दिसत आहे..मात्र त्यात कितपत यश येईल हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होईल..


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *