महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
फलटण तालुक्यात मागच्या काही दिवसांपासून चोरीच्या घटना अधिक वाढल्या होत्या.वारंवार तक्रारी येत असल्यामुळे पोलिसही चिंतेत होते.त्यानंतर पोलिसांनी ७ ट्रॅक्टर आणि १ मोटार सायकल चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करीत पोलिसांनी आत्तापर्यंत तीन आरोपींना अटक केली असून आणखी कोणाचा समावेश आहे का ? त्यांचा तपास सुरू आहे.फलटण ग्रामीण पोलिसांनी चांगली कामगिरी केल्यामुळे जिल्ह्यात सगळीकडं त्यांच कौतुक होत आहे.
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या तिघांकडून ७ ट्रॅक्टर,१ मोटर सायकल असा एकूण ६४ लाख ७० हजारांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलिसांनी सुरज शंकर मदने,(वय.३५ वर्ष) अनिकेत महेश जाधव (दोघेही रा.खडकवस्ती,सगोबाचीवाडी,ता. बारामती) राजेंद्र मारुती जाधव (रा.ढाकाळे,ता.बारामती, जि.पुणे) अशी पोलिसांनी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत..
ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,फलटण हद्दीतील लक्ष्मी नगर येथून महिंद्रा अर्जुन कंपनीचा ट्रॅक्टर चोरीस गेल्या बाबत फिर्याद देण्यात आली होती.त्या अनुषंगाने पोलिसांनी या सर्व घटनांचा बारकाईने व सखोल अभ्यास केल्यावर असे निदर्शनास आले की, संशयित आरोपींनी चोरी करतानाचा मार्ग वेगळा आणि चोरी झाल्यानंतर जातानाचा मार्ग वेगळा अशा प्रकारे चोऱ्या केल्या असल्याची माहिती मिळाली.त्यानंतर पोलिसांनी चोरी झालेल्या ठिकाणा जवळील सीसीटीव्ही कॅमेरे फुटेज व तांत्रिकदृष्ट्या माहिती घेत आरोपींना ताब्यात घेतलं.यावेळी पोलिसांनी ट्रॅक्टर चोरीच्या होण्याच्या अनुषंगाने विचारपूस केली असता,सुरुवातीला संक्षिप आरोपींनी माहिती दिली परंतु पॉलिसी खात्या दाखवताच त्यांनी आपला साथीदार राजेंद्र जाधव यांच्या साथीने ट्रॅक्टर चोरीच्या एकूण सात व मोटारसायकल चोरीच्या एक गुन्ह्याची कबुली दिली..
यातील सुरज मदने अट्टल चोर
यातील आरोपी सुरज मदने हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील अट्टल चोर आहेत.त्यांच्याविरुद्ध दुचाकी चोरीचे, फसवणूक,पुरावा नाहीसा करणे चोरीच्या उद्देशाने एकत्र जमणे अशा प्रकारचे तब्बल १८ गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती मिळाली..
ही कामगिरी सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख,अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूसकर,उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील महाडिक,गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहा. पोलीस निरीक्षक विशाल वायकर पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने,पोलीस अंमलदार शांतीलाल ओंबासे, नितीन चतुरे,श्रीनाथ कदम,अमोल जगदाळे,हनुमंत दडस वैभव सूर्यवंशी,रशीद पठाण व कल्पेश काशीद यांच्या पथकाने केलेली आहे.या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार शांतीलाल ओंबासे हे करीत आहेत