Baramati Vidhansabha| बारामती मधून जय पवार की अजित पवार लढणार ? अखेर कोण लढणार हे ठरलं ?


बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क..

राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजू लागले आहे.राजकीय पक्षांच्या बैठका आणि सर्व्हे सुरु आहेत.उमेदवार ठरवले जात आहेत.युती अन् आघाड्यांमध्ये जागा वाटप सुरु आहे.आता राजकीय तज्ज्ञांचे नव्हे तर सर्वांचे लक्ष बारामतीकडे लागले आहे. बारामती पवार कुटुंबियांमुळे देशात अन् राज्यात चर्चेत असलेले शहर आहे.लोकसभा निवडणुकीत पवार विरुद्ध पवार हा सामना दिसला.आता विधानसभा निवडणुकीत हाच सामना दिसणार आहे.आणि यामुळेच विधानसभा निवडणुकीत सगळ्यांचे लक्ष बारामती विधानसभा मतदारसंघावर असणार आहे.

बारामतीत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून युगेंद्र पवार लढणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे.आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीनेही याबद्दल भूमिका स्पष्ट केली आहे.लोकसभा निवडणुकीत बारामतीत पवार विरुद्ध पवार असा संघर्ष बघायला मिळाला होता.विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने दुसऱ्यांदा पवार विरुद्ध पवार राजकीय संघर्ष होणार,हे निश्चित मानले जात आहे.लोकसभा निवडणुकीपासूनच युगेंद्र पवार विधानसभेची तयारी करत आहेत.पण, अजित पवारांनी वेगवेगळी विधाने केल्याने आणि जय पवारांच्या भेटीगाठी वाढल्याने बारामतीतून अजित पवार स्वतः लढणार की मुलगा जय पवार हे निवडणुकीच्या मैदानात उतरणार, याबद्दलच्या चर्चा होत आहेत.या चर्चांना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पूर्णविराम दिला…

‘यावेळी सुनील तटकरे यांनी बारामती विधानसभा मतदारसंघातून कोण लढणार ? या प्रश्नाभोवती फेर धरलेल्या चर्चेला पूर्णविराम दिला.लोकसभा निवडणुकीवेळी ज्या प्रमाणात आमची मते भाजपाला पडायला हवी होती,ती पडली नाहीत; हे खरं आहे.पण, आम्ही महायुती म्हणून काम करत आहोत.त्यामुळे विधानसभा निवडणुकीला तसे होणार नाही.यावेळी वेगळा निकाल दिसेल”असा दावा त्यांनी केला.अजित पवार बारामतीतून लढणार की नाही,या गोंधळाबद्दल ते म्हणाले की,अजित पवार बारामती विधानसभा मतदारसंघातूनच लढणार आहेत.लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यात लढत झाली होती.शरद पवारांच्या कन्या विरुद्ध अजित पवारांच्या पत्नी असा हा राजकीय संघर्ष होता.पण विधानसभा निवडणुकीत काका विरुद्ध पुतण्या असा राजकीय लढाई दिसणार असल्याचे म्हटले जात आहे..


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *