मोरगाव : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
पुणे ग्रामीण हद्दीत दिवसा घरफोडीचे प्रमाण वाढत असल्याने या गुन्ह्यातील आरोपी अटक करण्याबाबत पोलीसांसमोर मोठे आव्हान झाले होते.याबाबत घरफोडी करणारा पांडुरंग भाऊसो कुदळे यास बारामती तालुक्यातील सुपा ग्रामीण पोलीसांनी अटक केली आहे .
बारामती तालुक्यासह ग्रामीण भागात गेल्या अनेक महिन्यांपासून घरफोडीचे सत्र सुरु होते.या घडणा-या गुन्हयाबाबत पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक पंकज देशमुख यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांनी दिवसा व रात्री घरफोडी करणाऱ्या आरोपींचा शोध घेण्याबाबत सुचना दिल्या होत्या.त्या अनुषंगाने पोलिसांनी गुप्त बातमीदारामार्फत मिळालेली माहिती वरुन संशयित आरोपी पांडुरंग भाऊसो कुदळे वय.४० वर्षे (रा.गिरीराजनगर,पिंपळी,ता.बारामती,जि. पुणे) यास ताब्यात घेतले आहे.
आरोपीकडे अधिक विचारपुस चौकशी केली असता त्याने सुपा पोलीस स्टेशनचे हाद्दीत सुपा व देऊळगाव रसाळ येथे दिवसा घरफोडी केली असल्याची कबुली दिली.त्याच्याकडुन सुपा पोलीस स्टेशन येथील गुन्ह्यात चोरलेला एकुन ४०,००० रुपये किंमतीचा मुद्देमाल व सुपा पोलीस स्टेशन गुन्ह्यातील चोरलेला एकुन ४९,५०० रुपये किंमतीचा मुद्देमाल तसेच गुन्हयात वापरलेली मोटार सायकल व गुन्हात वापलेल्या इतर वस्तु असा एकुन १,३९,६५० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन २ गुन्हे उघडकीस आणले आहेत.
ही कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक पंकज देशमुख,अप्पर पोलीस अधिक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली,सहा.पोलीस निरीक्षक मनोजकुमार नवसरे,पोलीस उपनिरीक्षक जिनेशकोळी,पोलीस अंमलदार रुपेश साळुंके,राहुल भाग्यवंत संदिप लोंढे, विशाल गजरे,पोलीस कर्मचारी सचिन दरेकर,सागर वाघमोडे,संतोष जावीर,तुषार जैनक,महादेव साळुंके, किसन ताडगे यांच्या पथकाने केलेली आहे.