सांगली : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क..
शरद पवार हे जातीयवादाचं विद्यापीठ आहे. सुप्रिया सुळे या लहानपणीपासून त्यांच्याकडूनच हे सगळं शिकल्या असल्याची जहरी टीका भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलीय.लिंबाच्या झाडापासून गोड फळांची अपेक्षा करुच नका.जसा बाप तशीच लेक असं म्हणत पडळकरांनी शरद पवारांसह सुप्रिया सुळेंवर जोरदार निशाणा साधला..
पडळकर म्हणाले की, सुप्रिया सुळे म्हणतात की,अजित पवारांवर सहानुभूती दाखवू नका.जरांगे-शिंदे आणि पवार हे तिघंही मराठा म्हणून जरांगे शिंदेंबद्दल बोलायचं नाही,असं सुप्रिया सुळे बोलल्या.महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आता यात वेळीच हस्तक्षेप करायला पाहिजे.मुख्यमंत्र्यांचं नाव घेऊन इथं महायुतीत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे.
नेमकं काय म्हणाल्या होत्या सुप्रिया सुळे –
‘जरांगे-शिंदे-पवारसे बैर नही, देवेंद्र फडणवीस तेरी खैर नही’, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी एका सभेत केली होती. या टीकेवर भाजपा आमदार गोपिचंद पडळकर यांनी उत्तर देत म्हटले की,सुप्रिया सुळे म्हणजे किडकी बहीण आहेत. अजित पवारांनाही सहानुभूती दाखवायची नाही असंसुळे म्हणतात.अजित पवार महाराष्ट्रभर लाडकी बहीण योजनेसाठी फिरत असताना सुप्रिया सुळे स्वत:तील किडकी बहीण महाराष्ट्राला दाखवत आहेत,अशी खोचक टीकाही गोपीचंद पडळकरांनी सुप्रिया सुळेंवर केली.यावेळी पडळकर म्हणाले की,देवेंद्र फडणवीस यांना नियोजनबद्ध पद्धतीने कसे टार्गेट केले जात आहे.यांच्यावर हल्ला केला जातोय,तो हल्ला करून घेण्यासाठी काही माणसे पेरायची, विशिष्ट संघटनांना बळ द्यायचे, काही पत्रकारांना हाताशी धरायचे आणि देवेंद्र फडणवीसांवर जातीयवादातून टीका करायची,असे त्यांनी म्हटले आहे.
शाहू महाराजांच्या वारसांना संधी दिली नाही
गोपीचंद पडळकर म्हणाले की, स्वत:ला पुरोगामी म्हणवून घ्यायचे आणि जेव्हा राजर्षी शाहू महाराजांचे वारस छत्रपती संभाजीराजेंना खासदारकी दिली तेव्हा पूर्वी छत्रपती पेशव्यांना नेमायचे आणि आता पेशवे छत्रपतींना नेमतायेत असे विधान द्यायचे. देवेंद्र फडणवीसांनी राज्यसभा देण्याआधी शाहू महाराजांच्या वारसांना यांनी कधीही खासदारकी दिली नव्हती असा आरोप त्यांनी केला.
केवळ ब्राम्हण म्हणून फडणवीसांना टार्गेट –
पडळकर म्हणाले की, केवळ ब्राम्हण असल्यामुळे फडणवीसांना जाणून-बुजून टार्गेट केलं जात आहे. विशिष्ट संघटनांना बळ देऊन, काही पत्रकारांना हाताशी धरून फडणवीसांवर टीका केली जात आहे. स्वत:ला पुरोगामी म्हणायचं आणि राजर्षी शाहू महाराजांचे वारस संभाजी महाराजांना देवेंद्र फडणवीसांनी खासदारकी दिली तेव्हा पूर्वी छत्रपती पेशव्यांना नेमायचे आता पेशवे छत्रपतींना नेमतात,अशी वक्तव्य करायची. खरं तर देवेंद्र फडणवीस यांनी राज्यसभा खासदार करण्यापूर्वी राजर्षी शाहू महाराजांच्या वारसांना तुम्ही कधीही खासदारकी दिली नव्हती,अशी टीका पडळकर यांनी केली आहे.