राज्य सरकारकडून तब्बल ५६ कोटी ७६ लाख १६ हजार ४४० रुपयांची मान्यता देण्यात आली..
बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क..
राज्य शासनाच्या वतीने पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात गोजुबावी येथे पोलीस श्वान प्रशिक्षण केंद्र उभारण्यासाठी राज्य सरकारने मान्यता दिली आहे..या अगोदर हे श्वानपथक पुणे येथे असून,त्याचे बांधकाम मोडकळीस आल्याने राज्य सरकारने हा निर्णय तात्काळ घेतला आहे..या श्वान पथकात १०२ गुन्हे शोधक, ७४ बॉम्ब शोधक,४५ अंमली पदार्थ शोधक,५ गार्ड ड्युटी,४ पेट्रोलिंग आणि बीडीएस पथकातील १२० असे ३५० श्वान असणार आहेत..यामुळे या नवीन श्वान प्रशिक्षण केंद्रात एकाच वेळी ५० श्वानांना प्रशिक्षण देण्याची सुविधा उपलब्ध असणार आहे..
जवळपास ७ हेक्टर जागेवर हे पोलीस श्वान प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार आहे.तसेच भविष्यात वनविभाग,राज्य उत्पादन शुल्क,कारागृह,एस.डी आर.एफ या संस्था देखील त्यांच्या श्वानांना या केंद्रात प्रशिक्षण देऊ शकणार आहेत.. यासोबतच या प्रशिक्षण केंद्राकरीता एक पशुवैद्यकीय अधिकारी आणि एक पशुवैद्यकीय अधिकारी मदतनीस अशी दोन पदे देखील निर्माण करण्यात येणार आहे.. या प्रशिक्षण केंद्रासाठी तब्बल ५६ कोटी ७६ लाख १६ हजार ४४० रुपयांची मान्यता राज्य शासनाकडून देण्यात आली आहे.. या जागेची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पाहणी देखील करण्यात आली आहे.. यामुळे पुन्हा एकदा बारामतीच्या वैभवात आणखी एक भर पडणार आहे…