BIG BREAKING : बारामती तालुक्यातील धक्कादायक घटना; ग्रामपंचायत निवडणुकी निकालानंतर दोन गटात तुफान राडा…दोन्ही गटातील ३४ जणांवर तर अनोळखी ६० जणांवर गुन्हा दाखल..!!


बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

बारामती तालुक्यातील ३१ ग्रामपंचायतीच्या मतमोजणीचा काल निकाल लागला..यामध्ये बारामती तालुक्यातील सायंबाचीवाडी येथील देखील निकाल लागला..या निकालानंतर मात्र गावातील दोन्ही गटांमध्ये जोरदार धुमश्चक्री झाली. या घटनेत बाचाबाचीवरून हा व थेट मारहाणीपर्यंत पोहोचला,आणि यात दोन्ही पार्ट्यांनी एकमेकांवर दगडफेक केली.या घटनेत वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या… घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वडगाव निंबाळकर पोलिसांनी दोन्ही गटातील ३४ जणांसह अनोळखी ६० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यामध्ये पोलीस पाटील यांना देखील मारहाण करण्यात आली असून पोलीस पाटलांच्या फिर्यादीनुसार दुर्योधन भापकर यांच्या विरोधात शासकीय कामात अडथळा आणण्याचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी पोलीस कर्मचारी तौसिफ महंमद मणेरी यांनी फिर्याद दिली..

याप्रकरणी उद्योजक दुर्योधन भापकर,साहेबराव भापकर गौरव भापकर,निखील भापकर, आदित्य भापकर,हर्षद भापकर,मयुर भापकर,विजय भापकर केशव भापकर, दिपक भापकर, विकास अभंग,नानासो भापकर सुरज जगताप,वैभव भापकर, मंथन भापकर,सौरभ घाडगे,यश भापकर,प्रविण जगताप,यश जगताप,भरत आंधळे, ऋषिकेश जगताप,वैभव जगताप,हणुमंत भगत,विकास जगताप,श्रीकांत भापकर,मेघराज जगताप,रघुनाथ भगत, सुभाष जगताप,मयुर जगताप,प्रतिक जगताप,मंगेश जगताप,प्रणव जगताप,शतायु जगताप,दिलीप जगताप, प्रमोद जगताप,निलेश जगताप यांच्या ५० ते ६० अनोळखी लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे..

याबाबत वडगाव निंबाळकर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सायंबाचीवाडी ग्रामपंचायत निवडणूकीत उद्योजक दुर्योधन भापकर यांच्या नेतृत्वाखालील स्वयंभू परिवर्तन पॅनेल व डी.पी.जगताप यांच्या नेतृत्वाखालील स्वयंभू हिराबाई माता ग्रामविकास पॅनेल यांच्यात लढत झाली.या पॅनेलचे पाच सदस्य निवडून आले आहेत. दुर्योधन भापकर यांच्या नेतृत्वाखालील स्वयंभू परिवर्तन पॅनेलने दोन सदस्यांसह सरपंचपदाची जागा जिंकली. पॅनेलचे कार्यकर्ते विजयानंतर देवदर्शनाला निघाले होते.यावेळी स्वयंभू परिवर्तन पॅनेल यांचे कार्यकर्ते देवदर्शनाला आले. समोरासमोर आल्यानंतर सुरुवातीला बाचाबाची आणि त्यानंतर दगडफेक झाली.दोन्ही गट एकमेकांना भिडले.त्यामुळे गावच्या यात्रेतच तणावाची स्थिती निर्माण झाली.काही वाहनांचे या घटनेत काचा फुटून नुकसान झाल्याची माहिती मिळाली. वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन काळे व कर्मचाऱ्यांनी तात्काळ तेथे पोहोचत परिस्थिती नियंत्रणात आणली.दोन्ही गटांनी परस्पर विरोधी तक्रारी पोलिसांकडे दिल्या आहेत.याप्रकरणी अधिक तपास वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक लव्हटे हे करीत आहेत…


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *