लवकरच शहर व तालुक्यातील आणखी गुन्हेगार तडीपार होणार;इंदापूर पोलिसांची मोठी कारवाई…
इंदापूर : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
इंदापूर पोलिसांनी अवैधरित्या व विनापरवाना गायांची कत्तल करणाऱ्या टोळीला एका वर्षासाठी तडीपार पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलंय.या टोळीविरोधात इंदापूर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र प्राणी संरक्षण प्रतिबंधक अधिनियमानुसार तब्बल पाच गुन्हे दाखल असल्याने या टोळीला तडीपार करण्यात आलय. याप्रकरणी रशीद इस्माईल कुरेशी ( टोळीप्रमुख )इरफान इमाम शेख,वय.३२वर्षे ( रा.कांदलगांव,ता.इंदापुर,जि. पुणे ) अजीम मुनिर कुरेशी,कलीम कय्युम कुरेशी,समीर हारूण कुरेशी, अश्पाक रियाज कुरेशी सर्वजण ( रा. कुरेशीगल्ली,ता.इंदापूर,जि. पुणे ) अशी तडीपार केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.
या टोळीच्या विरोधात मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ५५ प्रमाणे कारवाईसाठी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयात प्रस्ताव सादर करण्यात आला होता.या अनुषंगाने पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी या टोळीला पुणे जिल्हा तसेच अहमदनगर जिल्हयातील कर्जत,सोलापुर जिल्हयातील माळशिरस, माढा तसेच सातारा जिल्हयातील फलटण,पुणे शहर, पिंपरी चिंचवड या ठिकाणांहून तडीपार करण्यात आलंय इंदापूर पोलिसांनी या टोळीला तात्काळ ताब्यात घेऊन इंदापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतुन उस्मानाबाद हद्दीत सोडण्यात आलेले आहेत.तसेच इंदापुर शहरातील व ग्रामीण भागातील आणखी गुन्हेगार लवकरच तडीपार करण्यात येणार असल्याची माहिती इंदापूर पोलिसांकडून देण्यात आली आहे..
या कारवाईमध्ये पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी सहभाग नोंदवलेला आहे.
यात अप्पर पोलीस अधिक्षक आनंद भोईटे,उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती उपविभाग गणेश इंगळे, पोलीस निरीक्षक इंदापूर पोलीस स्टेशन दिलीप पवार, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पुणे ग्रामीण अविनाश शिळीमकर,सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे,स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस कर्मचारी महेश बनकर,प्रकाश माने,ज्ञानेश्वर जाधव, सचिन बोराडे विरभद्र मोहळे,सलमान खान,नंदु जाधव गजानन वानोळे यांच्या पथकाने केलेली आहे…