बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
बारामती शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत काळ्या बाजारात विक्रीसाठी करणाऱ्यांवर शहर पोलिसांनी कारवाई केली असून या कारवाईत ५० किलो तांदळाच्या २४ पिशव्या तांदूळ पोलिसांनी जप्त केलाय.याप्रकरणी गाडीमालक गणेश मारुती दळवी ( रा.डोर्लेवाडी,ता. बारामती ) याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याच्यावर बारामती शहर पोलीस ठाण्यात अत्यावश्यक वस्तू कायदा कलम ३,७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे…
याबाबत शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाकाबंदी दरम्यान डोर्लेवाडी गुणवडी रोडवरून काळ्या बाजारात तांदूळ विक्रीसाठी घेऊन जाणारी गाडी पोलिसांनी ताब्यात घेतली असून,गाडी चालकाने हा तांदूळ त्याने खरेदी केला आहे असे सांगितले कारण त्या तांदळाला खाजगी साध्या गोण्या होत्या.म्हणून त्याला कोणत्या शेतकऱ्याकडून किंवा मार्केट कमिटीकडून तांदूळ खरेदी केल्याच्या पावत्या आणून देण्यास सांगितले असता,त्याने पावत्या घेऊन येतो असे सांगितले परंतु त्यांनी पावत्या हजार न केल्याने पोलिसांनी तांदूळ हा रेशनिंगचा असल्याच्या संशयावरून गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केली आहे.या गुन्ह्याचा तपास सहा.पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ हे करत आहेत…