लोकसभा सचिवालयानं नोटीफिकेशन जारी केले.
नवी दिल्ली : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
गुजरातच्या सुरत न्यायालयाने राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर राहुल गांधी आणि काँग्रेससाठी एक आणखीन मोठी धक्कादायक बातमी समोर आली आहे. काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांना कालच दोन वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली असताना आज पुन्हा एकदा राहूल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे.