बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी वाशिम येथे भारत जोडो यात्रेदरम्यान झालेल्या सभेवेळी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी चुकीचे वक्तव्य करुन टीका केली, त्याबद्दल बारामतीत मनसेच्या वतीने गांधी यांचा जाहीर निषेध करीत जोडे मारो आंदोलन केले.यावेळी राहुल गांधी यांनी तात्काळ माफी मागावी अशी मागणी देखील मनसेच्या वतीने करण्यात आली.
भिगवण चौकातील झालेल्या या आंदोलनात मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला होता.यावेळी “जय भवानी, जय शिवाजी”, “स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अवमान करणाऱ्या राहुल गांधींचा धिक्कार असो” अशा घोषणांनी हा चौक दणाणून सोडला. यावेळी मनसेचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष एडवोकेट सुधीर पाटसकर यांनी राहुल गांधी यांचा खरपूस समाचार घेत,ज्याला देशाचा इतिहास ज्याला माहीत नाही,अशी माणंस आज स्वातंत्र्यवीरांचा अपमान करीत आहेत.ज्यांनी या देशाचे तुकडे केले.ज्यांनी अखंड हिंदुस्तानचा पाकिस्तान, बांगलादेश केला.त्या कुटुंबातील सदस्य आता भारत जोडो यात्रेला निघालेला आहे. असे म्हणत गांधींचा समाचार घेतला. त्यांना जर भारत जोडायचा असेल.
ज्यादिवशी अखंड हिंदुस्तान होईल त्या दिवशी हा भारत जोडला जाईल.असे देखील आवर्जून सांगितले.राहुल गांधींनी बेताल वक्तव्य करून त्याच्या पप्पूगिरीचं अवलोकन पुन्हा एकदा भारतीय जनतेला दाखवून दिलेला आहे. त्यामुळे अशा या पप्पूचा मनसेच्या वतीने आम्ही तीव्र शब्दांमध्ये निषेध व्यक्त करतो.तसेच त्यांच्या आजींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बद्दलची लिहिलेली जी काही पत्र आहेत,केलेली जी काही वक्तव्य आहेत, केलेले जे काही लिखाण आहे ते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा अभ्यासावं आणि त्यांनी या सावरकरांची राष्ट्राची संपूर्ण स्वातंत्र्य सैनिकांची माफी मागावी अशी मागणी देखील मनसेच्या वतीने करण्यात आली.तसेच लवकरच देव त्यांना सुबुद्धी देऊ आणि त्यांच्या पार्टीतील जागरूक बुद्धिवाल्यांनी त्यांना सल्ला द्यावा आणि मग ते स्वातंत्र्यवीरांची जाहीर माफी मागतील असा विश्वास देखील ऍड.सुधीर पाटसकरांनी व्यक्त केला.यावेळी
मनसेचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष ऍड.सुधीर पाटसकर, पुणे जिल्हा उपाध्यक्ष पोपट सूर्यवंशी , तालुकाध्यक्ष ऍड.निलेश वाबळे, ऍड.सोमनाथ पाटोळे, शिवसंग्रामचे संग्रामसिंह जाचक,ऋषिकेश भोसले,अक्षय कदम अतुल कुंभार,स्वप्निल मोरे,प्रवीण धनराळे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.