BARAMATI NEWS : बारामती येथे लहुजी शक्ती सेनेच्या वतीने लहुजी वस्ताद साळवे यांची जयंती साजरी..!!


बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

भारतीय सशस्त्र क्रांतीचे आद्यजनक लहुजी वस्ताद साळवे यांच्या २२८ व्या जयंतीनिमित्त शहरातील कसबा येथील अण्णाभाऊ साठे चौक येथे लहुजी शक्ती सेना बारामती तालुका व शहराच्या वतीने अभिवादन करण्यात आले.बारामती नगर परिषदेचे गटनेते सचिन सातव, माजी जिल्हा परिषद सदस्य के.टी.जाधव, माजी उपनगराध्यक्ष विजय खरातयांच्या हस्ते पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.

तसेच के.टी.जाधव यांनी आपल्या भाषणातून लहुजी वस्ताद यांचे असलेले योगदान सांगितले.यावेळी लहुजी शक्ती सेना युवक पुणे जिल्हाध्यक्ष पप्पू भिसे, तालुका अध्यक्ष सुरज खंडाळे, शिवधर्म फाउंडेशनचे कृष्णा भाऊ क्षीरसागर, शहर अध्यक्ष अतुल गायकवाड, शहर युवक अध्यक्ष आकाश पाटोळे, डॉ.विजयकुमार भिसे, संजय नेटके, अमोल इंगळे, योगेश नालंदे, रविंद्र कुचेकर,अतुल ननवरे,राजेंद्र भिसे,सुरज देवकाते, मनोज कवाळे,धनाजी यादव, विक्रम लांडगे, विजय नेटके यांसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *