बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केल्याने राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.पुढील २४ तासांत अब्दुल सत्तार यांनी माफी मागावी अन्यथा त्यांना आमच्या भाषेत उत्तर दिले जाईल असा धमकी वजा इशारा देखील राष्ट्रवादी काँग्रेसने दिला आहे.
यातच बारामती तालुक्यातील डोर्लेवाडी गावात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून अब्दुल सत्तार यांनी केलेल्या वक्तव्यांचा निषेध करण्यात आला.यावेळी अब्दुल सत्तार तुझं कस र काय,खाली मुंड वर पाय”अशी घोषणाबाजी करण्यात आली.यावेळी शिंदे सरकार हाय हाय अशी देखील घोषणाबाजी करीत शिंदे सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस अविनाश काळकुटे,सरपंच पांडुरंग सलवदे, अशोक नवले,गजानन नाळे,बापू निलाखे,पीटू भोपळे आदी कार्यकर्ते या निषेध आंदोलनात सहभागी झाले होते.
नक्की काय म्हणाले अब्दुल सत्तार …
एका वृत्तवाहिनीच्या पत्रकाराने त्यांना एक प्रश्न विचारला. यावेळी सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना ऑन कॅमेरा शिवीगाळ केली.झाले असे की, सुप्रिया सुळेंनी 50 खोके मिळाले का, असा प्रश्न अब्दुल सत्तारांना केला होता. यावर सत्तारांनी तुम्हालाही द्यायचे का, असा प्रतिप्रश्न केला होता.सुप्रिया सुळे यांनी प्रत्युत्तर देत तुमच्याकडे असल्यानेच तुम्ही ऑफर करत असल्याची टीका केली होती.तर, सत्तारांनी इतकी भि***ट झाली असेल तिलाही देऊ,असे उत्तर दिले होते.