भिगवण : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
बारामती तालुक्यानंतर इंदापुर तालुक्यात सावकारीचे सर्वात जास्त पेव फुटले असून,भिगवण परिसरात देखील मोठ्या प्रमाणात सावकारी सुरू असल्याच्या चर्चा असून, यातील काही सावकार मस्तवाल सावकारांचा व्याजाच्या पैशावर नंगानाच सुरू आहे.अशीच एक घटना इंदापूर तालुक्यातील भिगवण हद्दीतील पिंपळे येथे घडली आहे. दोन लाख मुद्दलेच्या बदल्यात ६ लाख ९५ हजार एवढे व्याज देऊनही तब्बल ४० लाखांची मागणी करत शिवीगाळ व मारहाण करणाऱ्या सात सावकरांवर भा. द.वि कलम १४३,१४७,३२३,५०४, ५०६ सह महाराष्ट्र सावकारी प्रतिबंधक कायदा २०१५ चे कलम ३९,४५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बापूराव नभाजी कुलाळ,संगीता बापूराव कुलाळ दोघेही ( रा.तरटगाव,ता. फलटण,जि.सातारा ) बाबू गेनू वाघमोडे ( रा.मलठण,ता.दौंड, जि.पुणे ),कुंडलिक जनार्दन भिसे ( रा.पिंपळे,ता. इंदापूर,जि.पुणे ) व तीन अनोळखी एसम अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.याप्रकरणी अंबादास दत्तू भिसे,वय.४५ वर्षे ( रा.पिंपळे, ता.इंदापूर,जि.पुणे ) यांनी फिर्याद दिली आहे.ही घटना डिसें.२०१८ ते ऑक्टो.२०२२ दरम्यान घडली आहे.
याबाबत भिगवण पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार,संशयित आरोपी खासगी सावकारांनी फिर्यादीच्या आर्थिक अडचणीचा गैरफायदा घेत फिर्यादीला दोन लाख रुपये पाच टक्के व्याजदराने देत, त्याचे तारण म्हणुन फिर्यादींच्या पिंपळे येथील मालकीची असणारी जमीन गट क्र.२८ मधील ४० आर क्षेत्राचे खरेदीखत करून घेतले होते.त्यानुसार फियादी अंबादास भिसे यांच्याकडून वारंवार मुद्दल व व्याज असे वेळोवेळी तब्बल ६ लाख ९५ हजार रुपये दिले असताना देखील फिर्यादींची जमीन फिर्यादीला परत न देता फिर्यादीकडेच व्याज व मुद्दल अशी एकूण ४० लाख रुपयांची मागणी केली.यामध्ये फिर्यादींनी खासगी सावकार बापू कुलाळ व संगीता कुलाळ यांना करून दिलेल्या खरेदी खताची नोंद होऊ नये यासाठी तक्रारी अर्ज दिल्याचा राग मनात धरून खासगी सावकारांनी गर्दी गोळा करून फिर्यादीला शिवीगाळ करून लथाबुक्क्यांनी मारहाण केली. असल्याचे फिर्यादीने फिर्यादीत महंटले आहे.या गुन्ह्याचा अधिक तपास भिगवण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रुपेश कदम हे करीत आहेत.