BIG NEWS : बारामती गोळीबार प्रकरणातील पाच आरोपींना अटक; पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व तालुका पोलिसांची संयुक्त कारवाई ..!!


बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

बारामती शहरातील भिगवण रोडवरील रिलायन्स पेट्रोल पंपात गणेश जाधव गोळीबार प्रकरणातील पाच जणांची तालुका पोलिसांनी व पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ताब्यात घेतले असल्याची माहिती पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक गोयल यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली.शुभम विकास राजपुरे,वय २४ वर्षे ( रा.मुर्टी मोढवे,ता.बारामती ), तुषार चंद्रकांत भोसले, वय.२२ वर्षे ( रा. रुईपाटी,ता.बारामती ),सूरज राजू काशिद,वय.२७ वर्षे ( रा.सावळ, ता.बारामती ), तेजस रतीलाल कर्चे,वय.२१ वर्षे ( रा.सुर्यनगरी, बारामती ) विक्रम लालासो बोबडे वय.२६ वर्षे ( रा.रुई-सावळ,ता. बारामती ) अशी पोलिसांनी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.याप्रकरणी बारामती तालुका पोलीस गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी पत्रकार परिषद घेत दिलेल्या माहितीनुसार,गुरुवारी सायंकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली होती.संशयित आरोपी शुभम राजपुरे,तुषार भोसले यांनी सात ते आठ साथीदारांसह हातात कोयता घेऊन येत बारामतीचा मी बाप आहे,तू कोण आमच्यावर दादागिरी दाखविणारा, बारामतीत माझीच दादागिरी चालणार असे म्हणत गणेश जाधव याला जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने बंदुकीतून दोन गोळ्या झाडल्या होत्या.या घटनेत जाधव याच्या पोटाच्या डाव्या बाजूला गोळी लागून तो गंभीर जखमी झाला होता.याप्रकरणी तालुका पोलिसांनी पथक नेमत व पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने पथक नेमण्यात आले होते.

या पथकाने तुषार भोसले,सूरज काशिद यांना पकडले. शुभम राजपुरे हा पिंपरी चिंचवड हद्दीत एका लाॅजवर थांबला होता. तेथून राजपुरे याच्यासह कर्चे व बोबडे यांना ताब्यात घेण्यात आले.या गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपी शुभम राजपुरे याच्यावर गंभीर १३ गुन्हे दाखल असून,त्यात खूनाच्या प्रयत्नाचा एक, दरोड्याचा एक, चोरीचे दोन,खंडणीचा एक,अवैध शस्त्र बाळगण्याचे दोन, मारामारीचे दोन व चोरीचे तीन गुन्हे दाखल आहेत. भोसरी येथील खूनाच्या गुन्ह्यात २०२० मध्ये जेलमध्ये होता.तो सध्या पॅरोल रजेवर सुटला असल्याची माहिती पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी पत्रकार परिषदेत दिली.

कारवाई पोलीस अधीक्षक अंकित गोयल,अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे,अपर पोलीस अधीक्षक बारामती विभाग मिलिंद मोहिते,उपविभागीय अधिकारी गणेश इंगळे,याच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अशोक शेळके पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे सहायक निरीक्षक नेताजी गंधारे सचिन काळे,पोलीस उपनिरीक्षक अभिजीत सावंत,अमित सिद पाटील,पोलीस अंलदार प्रकाश वाघमारे,मुकुंद कदम,काशीनाथ राजापुरे,हनुमंत पासलकर, ज्ञानदेव क्षिरसागर,आसिफ शेख, अभिजीत एकशिंग,अमोल शेंडगे, बाळासाहेब खडके,प्राण येवले,
धिरज जाधव,दगडु विरकर,बारामती तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे पोलीस उपनिरीक्षक दडस-पाटील,पोलीस कर्मचारी राम कानगुडे अमोल नरुटे,दराडे यांच्या पथकाने केली


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *