BARAMATI NEWS : बारामती ॲग्रो साखर कारखान्याच्या प्रदुषणामुळे सजीव त्रस्त :भालचंद्र महाडिक


बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

बारामती व इंदापूरच्या सीमेवर असणाऱ्यांना बारामती ॲग्रो साखर कारखाण्याच्या विरोधात सजीव संरक्षण आणि जागृती बहुउद्देशीय सामाजिक संस्था भारत संस्थापक अध्यक्ष भालचंद्र सर्जेराव महाडिक यांनी तक्रार दाखल केली आहे.बारामती ॲग्रो साखर कारखान्यांच्या मागे राजकीय पाठबळ असल्याने कारखान्यावर कारवाई करण्यास अधिकारी भीत आहे तसेच सिध्देश्वर निबोडी व शेटफळ गढे या दोन ग्रामपंचायत कार्यालयाच्या लगत हा कारखाना आहे परंतु कर्तव्यात कसूर करत असल्याने विरोध करणार तरी कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे.

तसेच अनेक वेळा बारामती ॲग्रो साखर कारखान्याच्या विरोधात तक्रारी दाखल केल्या जातात परंतु राजकीय दबाव व भ्रष्टाचारामुळे सर्व प्रकरण दाबले जात आहे सदर साखर कारखान्याच्या विरोधात जनसुनावणी दिनांक १९ ऑगस्ट २०१६ चालवण्यात आली त्यामध्ये प्रश्न विचारणारे सर्व नागरिकांना हाताशी धरून प्रकरणं निकाली काढण्यात आले त्यामध्ये जे कारखान्याच्या बाजुने मांडणी करणाऱ्या जबाबदार अधिकारी यांनी कोणत्याही नियमाचे पालन केले दिसत नाही कारण बारामती ॲग्रो साखर कारखान्याचे प्रदुषण नैसर्गिक जल स्रोत राजरोसपणे पाटबंधारे विभागाच्या ताऱ्यांचा वापर करून सोडले जात आहे जेथे ते पाणी सोडले जात आहे

तेथे शासकीय भुखंड आहे तसेच सिध्देश्वर निबोडी येथील तलावाचे पाणी सुध्दा संपुर्ण प्रदुषित झाले आहे पण तेथील ग्रामपंचायत हातबल झाल्याने प्रदुषणाचा विरोध करू शकत नाही.तसेच प्रदुषित पाणी हे तेथील शेतकऱ्यांच्या विहिरीत,शेतात जाते तसेच रस्त्यावरून जाताना दुर्गंधीत वास येतो कारखान्याच्या बॉयलर मधुन जी राख व धुर परीसरात मोठ्या प्रमाणात पसरतं आहे त्यामुळे सार्वजनिक उपद्रव निर्माण करणाऱ्या बारामती ॲग्रो साखर कारखान्याच्या व साथीदारांनच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *