बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
बारामती तालुक्यातील झारगडवाडीत गावात गुरुवारी आठ वाजता गाव भेट दौऱ्यानिमित्त आले होते.यावेळी ग्रामस्थांनी आमदार गोपीचंद पडळकर यांची वाजत गाजत घोड्यावरून गावातील पिंपळी चौक ते अहिल्यादेवी पुतळ्यापर्यंत मिरवणूक काढली. यावेळी झारगडवाडी गावातील शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. याचे आयोजन प्रवीण बोरकर, संघर्ष मासाळ, राहुल कुलाळ, राहुल जगताप, गणेश बोरकर, योगेश आढाव, उत्तम बोरकर,निलेश महाडिक आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
पडळकर हे गुरुवारी ( ता. १३ ) बारामती दौऱ्यावर होते. पडळकर यांचे बारामती शहराबरोबर ग्रामीण भागात देखील दौरा होता. यात तालुक्यातील डोर्लेवाडी, झारगडवाडी, सोनगांव, मेखळी गांवात गाठीभेटी देत ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या. ओबीसी घटकांना या सरकारच्या माध्यमातून न्याय मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार आहे. झारगडवाडीत रात्री आठ वाजता गाव भेट दौऱ्यानिमित्त आले होते यावेळी ग्रामस्थांनी आमदार पडळकर यांची वाजत गाजत घोड्यावरून गावातील पिंपळी चौक ते अहिल्यादेवी पुतळ्यापर्यंत मिरवणूक काढली यावेळी झारगडवाडी गावातील शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.