बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
शिवसेना म्हणणारे दोन्ही गट हे एकमेकांना गद्दार म्हणतात यात एकमेकांना गद्दार म्हणून महाराष्ट्राचे प्रश्न सुटणार आहे का ? या संदर्भातील अडचणी दूर होणार आहेत का ? असा टोला विरोधी पक्षनेते अजित पवारांनी शिवसेनेच्या दोन्ही गटांना लगावला. यामुळे याचा कुठेतरी अंतर्मुख होऊन विचार करा.लोकशाहीचा पार खेळ खंडोबा चाललेंला आहे,कोणीही काहीही करतंय कोणी माणसं फोडतंय. स्थिरताच राहिली नाही. असा संताप देखील पवारांनी व्यक्त केला आहे. तसेच दसरा मेळावा कसा झाला हे सर्वांनी पाहिलं.
बीकेसी आणि शिवाजी पार्क, दूसर काही नव्हतंच हे पांढरे कपडे घालून आले, ते आमक कपडे घालून आले काय नको असलं काय ते नको ते झाल.मात्र महागाईवर आणि बेरोजगारी वर कोणी बोलायला तयार नाही.आज ज्या समस्या शेतकरी कांदा उत्पादकाच्या आहेत,यावर कोणी बोलायला तयार नाहीत. तो साखरेचा कोठा आम्ही बंद करू हे कोणी सांगायला तयार नाही. तसेच वेदांता सारखा प्रकल्प ज्यामध्ये दोन लाख मुला मुलींना रोजगार उपलब्ध झाला असता तो का गेला ? याच उत्तर द्यायला हे तयार नाहीत. असा प्रतिसवाल देखील अजित पवारांनी शिवसेनेच्या दोन्ही गटांना केला.
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या २०२१-२२ च्या ६१ व्या गळीत हंगामाच्या मोळी पूजनाचा कार्यक्रम अजित पवारांच्या उपस्थितीत पार पडला यावेळी शेतकरी मेळाव्यात अजित पवार बोलत होते.यावेळी राज्याचे माजी राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे,संजय जगताप, दिपक चव्हाण,माळेगाव साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब तावरे,छत्रपती साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे, पीडीसीसी बँकेचे अध्यक्ष डॉ. दिगंबर दुर्गाडे,पीडीसीसी बँकेचे संचालक संभाजी होळकर, दत्तात्रय येळे आदींची प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.