पुणे : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
पुण्यातील कात्रज परिसरातील हॉटेल रूद्र चायनिज समोर,पुणे सातारा रोडवर कात्रज घाटाजवळ गोवा राज्यातील विक्रीस आणलेल्या विदेशी दारूची चोरटी वाहतूक करणाऱ्यांना गाडीसह राज्य उत्पादन शुल्क विभागाने ताब्यात घेतले असून,त्याच्यांवर महाराष्ट्र दारूबंदी कायद्याचे कलम ६५ (अ) (इ) ८१,८३,९०, १०३,१०८ नुसार विविध कलमांव्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की,पुणे-सातारा रोडवरील हॉटेल रूद्रजवळील परिसरात गोवा राज्यातील विदेशी दारूची चोरटी वाहतूक होत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली असता,राज्य उत्पादन शुल्क विभागाने तात्काळ त्याठिकाणी जात पाहणी केली असता,सदर ठिकाणी चोरट्या पद्धतीने दारूची होताना आढळून आली.यामध्ये निशान कंपनीची सनी चारचाकी कार क्र. MH.14.CX.2646 या वाहनामधून तब्बल ३२२७३५ रुपयांचा मुद्येमाल जप्त करण्यात आला.आरोपींना न्यायालयात हजर केले असता,मा.न्यायालयाने आरोपींना पाच दिवसाची पोलीस कस्टडी दिली.पोलीस कस्टडीमध्ये केलेल्या तपासामध्ये आरोपीने दिलेल्या माहितीनुसार पुणे सातारा रोडवर कात्रज घाटाजवळ भिलारेवाडी,कात्रज पुणे ४६ या ठिकाणी गोवा राज्य निर्मीत व विक्रीस असलेल्या विदेशी मद्य व चोरटी वाहतूक करणाऱ्या महिन्द्रा कंपनीची पिकअप बोलेरो चारचाकी कार क्र.MH.11.CH.0076 या वाहनातून तब्बल ५६५५२० रुपयांचा मुद्येमाल जप्त करण्यात आला.यातील नवीन आरोपीस मा.न्यायालयाने चार दिवसाची पोलीस कस्टडी दिली.या गुन्ह्यात आतापर्यंत गोवा राज्य निर्मीत् व विक्रीस असलेले विदेशी मद्य, दोन वाहन,दोन मोबाईल असा एकुण ८,८८,२५५/- किमंतीचा मुद्येमाल दोन आरोपींच्या ताब्यातून वाहतूक करत असताना जप्त करण्यात आला आहे
ही कारवाई राज्य उत्पादन शुल्कचे मुंबई आयुक्त कांतीलाल उमाप,मुंबई विभागाचे संचालक दक्षता व अंमलबजावणी विभागाचे सुनिल चव्हाण,राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाचे विभागीय उप-आयुक्त अनिल चासकर,राज्य उत्पादन शुल्क पुणे अधीक्षक चरणसिंग राजपूत, उपअधीक्षक,एस.आर.पाटील, युवराज शिंदे यांच्या मार्गदशनाखाली उत्पादन शुल्क निरीक्षक आर. पी.शेवाळे,दुय्यम निरीक्षक सी.एस.रासकर,एम.डी. लेंढे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक एस.एस.लोहकरे,जवान एस.जे भोर,व्ही.एस परते,कु.यु.एस भाबड यांच्या पथकाने केलेली आहे.या गुन्हयाचा अधिक तपास उत्पादन शुल्कचे निरीक्षक आर. पी.शेवाळे व फिर्यादी एस.जे.भोर जवान करत आहेत.