मुंबई : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेट्वर्क…
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री छगन भुजबळ आणि अन्य दोघांवर मुंबईत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चेंबूर येथील एका रहिवाशाला मारण्याची धमकी दिल्यानंतर त्या व्यक्तीने चेंबूर येथील पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. त्यानंतर भा.द.वि.कलम ५०६ अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान,ललितकुमार टेकचंदानी असं तक्रार दिलेल्या व्यक्तीचे नाव असून त्यांनी सांगितलं की, भुजबळ यांनी दोन व्हिडिओ शेअर करण्यात आले होते, ज्यामध्ये ते हिंदू धर्माविरोधात बोलत होते. त्यानंतर टेकचंदानी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. या प्रकरणी टेकचंदानी यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केल्यानंतर छगन भुजबळ आणि अन्य दोन व्यक्तींवर गुन्दा दाखल करण्यात आला.
दरम्यान, छगन भुजबळांनी मुंबईत समता परिषदेच्या कार्यक्रमातील सरस्वती पूजनाविषयी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वादाला तोंड फुटले होते. “शाळेत सरस्वती पूजन करण्यापेक्षा महात्मा फुले, सावित्रीबाई फुलेंच्या प्रतिमेटचे पूजन करायला हवे कारण सरस्वतीचे शिक्षणातील योगदान फक्त तीन टक्के आहे” असं वक्तव्य त्यांनी केलं होतं.