इंदापूर : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील युवा कीर्तनकाराने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली होती,संजय दशरथ मोरे असे आत्महत्या केलेल्या कीर्तनकार युवकाचे नाव आहे.याप्रकरणी किर्तनकाराला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी संशयित आरोपी पोलीस कर्मचारी महादेव जाधव याच्यावर इंदापूर पोलीस ठाण्यात भा.द.वि.कलम ३०६,३२४,३४,५०४, ५०६ नुसार विविध कलमांन्व्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मयताची बहीण अश्विनी दशरथ मोरे,वय.२६ वर्षे ( रा. डाळिंब मार्केटसमोर,नायर अण्णा खडी क्रेशरजवळ,ता.इंदापूर ) यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत इंदापूर पोलिसांनी दिलेल्या अधिक माहिती अशी की,मयताची बहीण अश्विनी मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, मयत संजय मोरे हे भजन व किर्तनकार म्हणून काम करीत होते.मयत मोरे हे किर्तन व भजन करत असल्याने त्याची किर्तनकार मधुकर जगदाळे यांच्याशी मैत्रीचे संबंध प्रस्थापित झाले होते. ८ सप्टेंबर रोजी १०.०० वाजण्याच्या सुमारास दोघांनी फिर्यादीच्या घरी येत संजय कुठे गेला आहे असे विचारले.त्यावेळी एकजण मयत संजय मोरे याला कारे रे तुला समजत नाही का ? तू वारंवार जगदाळे महाराजांज्या मुलीला फोन का करतो.त्यावेळी संजय याने मी कोणालाही फोन करीत नाही असे सांगितले असता,त्यावेळी त्या दोघांनी मयताला मारहाण करून शिवगाळ दमदाटी केली. त्यावेळी फिर्यादीने त्यांना नावे विचारली असता,त्यातील एकजणाने सांगितले की,जाधव साहेब आहेत.असे म्हणत दोघेजण निघून गेले.त्यानंतर काही वेळाने जाधव यांनी फोन करून मयत संजय याला तु रानात आहेस का ? घरी आहेस ? असे म्हणत घरी येऊन तुला त्याच दिवशी जीवच मारायला पाहीजे होते.
असे म्हणुन निघुन गेले.त्यानंतर मयत संजय याने आपल्या भावाला सांगीतले की,पोलीस कर्मचारी असलेला महादेव जाधव व त्याच्या साथीदारांनी १५ दिवसांपूर्वी मला देशपांडे व्हेज व तापी बिल्डींगमध्ये लाथाबुक्यांनी मारहाण केल्याचे सांगितले.तसेच महादेव जाधव हा वारंवार शिवीगाळ व दमदाटी करत मारहाण करीत असल्याचे सांगितले होते.त्याच्याच दुसऱ्या दिवशी मयत संजय याने घरात गळफास घेत आत्महत्या केली असून,संशयित आरोपी पोलीस महादेव जाधव व त्याच्या साथीदारांनी मयत संजय याला वारंवार शिवीगाळ व दमदाटी करत मारहाण केल्याने तसेच वारंवार फोन करून मानसिक व शारीरिक त्रास देत त्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे फिर्यादीने फिर्यादीत महंटले आहे.