Social News : अनुसूचित जातीतील नवउद्योजकांसाठी स्टँड अप इंडिया योजनेंतर्गत कर्ज योजना..!!


महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

केंद्र शासनाने स्टँडअप इंडिया ही योजना घोषित केली आहे.या योजनेत अनुसूचित जाती व नवबौध्द समाजाच्या घटकांतील उद्योजक लाभार्थ्यांना मार्जिन
मनी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत ही योजना सुरु करण्यात आली आहे.या योजनेंतर्गत राज्यातील अनुसूचीत जातीसाठीच्या सवलती घेण्यास पात्र असलेल्या अनुसूचित जाती घटकांतील नवउद्योजकांना १० % स्वहिस्सा भरणा केल्यानंतर बँकेने अर्जदारास स्टँड अप इंडिया योजनेंतर्गत ७५ % कर्ज मंजूर केल्यानंतर उर्वरित फ्रंट अँड सुबसिडी १५ % राज्य शासनामार्फत देण्यात येते.

या योजनेचा लाभ अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील जास्तीत जास्त नवउद्योजकांनी घ्यावा,असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त नितिन उबाळे यांनी केले आहे.तसेच या योजनेच्या सविस्तर माहितीकरिता सहायक आयुक्त,समाज कल्याण कार्यालय भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,बॉम्बे रेस्टॉरंट चौक,सातारा ( दुरध्वनी क्र. ०२१६२-२९८१०६) येथे संपर्क साधावा,असेही सहाय्यक आयुक्त उबाळे यांनी कळविले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *