BREAKING NEWS : राज्यात स्थापन झालेले सरकार हे दळभद्री सरकार असून,भाजपच्या येणाऱ्या चोव्वीसे पिढीने जरी जन्म घेतला तरी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या बारामतीत काही फरक पडणार नाही; मा.मंत्री धनंजय मुंडेचे इंदापूरात भाजपवर टिकाशस्त्र..!!


इंदापूर : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

राज्यातील स्थापन झालेले सरकार हे दळभद्री सरकार असून या सरकारच्या लोकप्रियतेवर ४५ प्लस चे स्वप्न पाहणे हे स्वप्नच राहून ते धुळीस मिळाल्या शिवाय राहणार नाही असे वक्तव्य राज्याचे माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी इंदापूर मध्ये केले आहे. ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या घरच्या गणपतीच्या दर्शनासाठी आले होते.

यावेळी बोलताना मुंडे म्हणाले की भाजपच्या येणाऱ्या पिढीने चोव्वीसे वर्ष जरी जन्म घेतला तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या पुणे, बारामती, पिंपरी चिंचवड या भागात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला काही फरक पडणार नाही.

भाजपची जी पॉलिसी आहे. ती आपल्या बाबतीत इतर ठिकाणी जेव्हा वातावरण खराब होते. त्या वेळेस अशा ठिकाणी जायचे की त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची चर्चा होईल. केवळ ही चर्चा होणे इतपतच त्यांचे बारामतीला येणे जाणे आहे. कारण या अगोदर अनेक निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने त्याच बारामती मध्ये स्वतःचे डिपॉझिट गमावले आहे असेही धनंजय मुंडे म्हणाले.

ते पुढे म्हणाले की भारतीय जनता पार्टीचे टार्गेट हे ४५ प्लस की ४८ प्लस अथवा ३०० प्लस एकट्या महाराष्ट्रातून निवडून येतात की काय याचे उत्तर मी देऊ शकत नाही. ज्यांनी टार्गेट ठेवले आहे तेच देऊ शकतात. टारगेट काय ठेवावे हा त्यांचा अधिकार आहे. परंतु जनतेने कोणाला मनामध्ये टार्गेट केला आहे. हे सर्वांना माहिती आहे असेही धनंजय मुंडे म्हणाले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *