महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
पोलीस ठाण्याच्या हद्दीतून रेतीची वाहतूक करण्यासाठी प्रति ट्रक १५ हजाराप्रमाणे ५ ट्रकसाठी ७५ हजार रुपये लाच मागून तडजोडी अंती ४५ हजार रुपये लाच स्वीकारताना उमरेड तालुक्यातील बेला पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षकाला नागपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले असून,लाचखोर पोलीस उपनिरीक्षक दिलीप पुंडलिक सपाटे,वय.५७ वर्षे ( रा.फ्रेंड्स कॉलनी,नागपूर ) याच्यावर बेला पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मंगरूळपीर तालुक्यातील तक्रारदाराने नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे लेखी तक्रार केली. तक्रारदार यांचे पाच ट्रक बेला परिसरातून रेतीची वाहतूक करतात.ही वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी सपाटे याने तक्रारदार यांना प्रति ट्रक १५ हजार रुपयेप्रमाणे ७५ हजार रुपये लाच मागितली.तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी नागपूर एसीबीकडे तक्रार केली.नागपूर एसीबीच्या युनिटने पडताळणी केली असता पोलीस उपनिरीक्षक दिलीप सपाटे याने ७५ हजार रुपये लाचेची मागणी करुन तडजोडी अंती ४५ हजार रुपये लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार गुरुवारी रात्री बेला परिसरात सापळा रचण्यात आला. तक्रारदार यांच्याकडून ४५ हजार रुपये लाच घेताना सपाटे याला रंगेहात पकडण्यात आले.
नागपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ही कारवाई केली आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला,अप्पर पोलीस अधीक्षक मधुकर गीते,यांच्या मार्गदर्शनाखाली उप अधीक्षक योगिता चाफले पोलीस निरीक्षक आशिष चौधरी पोलीस अंमलदार वर्षा मते,सुरेंद्र शिरसाट,अनिल बहिरे,अस्मिता मल्लेलवार, अमोल मेंघरे,हर्षलता भरडकर यांच्या पथकाने केलेली आहे.