BIG BREAKING : पुणे सोलापूर महामार्गावर गोळीबार करुन ३.५ कोटी लुणाऱ्या टोळीचा पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा व इंदापूर पोलीसांकडून पर्दाफाश ; कारवाईत १.४३ कोटी रुपये केले जप्त..!!


पुणे : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

पुणे-सोलापूर महामार्गावर भिगवन जवळ वरकुटे बुद्रुक हद्दीत शुक्रवारी पहाटे चारचाकी गाडीवर गोळीबार करुन तब्बल साडेतीन कोटी रुपयांची रोकड लुटणाऱ्या टोळीला पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखा आणि इंदापूर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या गुन्ह्यातील मुख्य आरोपीसह सहा जणांना पोलिसांनी ७२ तासांच्या आत अटक केली असून,लुटीतील रक्कम जप्त केली आहे.टोळीचा प्रमुख सागर शिवाजी होनमाने,वय. ३४ वर्षे ( रा.कुर्डुवाडी,ता. माढा,जि.सोलापूर ),बाळु उर्फ ज्योतिराम चंद्रकांत कदम,वय.३२ वर्षे ( रा.कुर्डुवाडी ), रजत अबू मुलाणी,वय.२४ वर्षे ( रा.न्हावी, ता.इंदापूर ),गौतम अजित भोसले वय.३३ वर्षे ( रा.वेने,ता.माढा ), किरण सुभाष घाडगे,वय.२६ वर्षे ( रा.लोणीदेवकर,ता. इंदापूर ), भूषण लक्ष्मीकांत तोंडे,वय.२५ वर्षे ( रा.लोणी देवकर,ता.इंदापूर ) या सहा जणांना पोलिसांनी अटक केली आहे.याबाबत भावेशकुमार अमृत पटेल यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी मुख्य आरोपी सागर होनामाने,ज्योतीराम कदम आणि रजत मुलाणी या तिघांना कुर्डुवाडी परिसरातून अटक केली.तर गौतम भोसले,किरण घाडगे, भूषण तोंडे या तिघांना राजस्थानमधील उदयपुर परिसरातून ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,फिर्यादी पटेल यांचा कुरियर सर्व्हिसेसचा व्यवसाय आहे.२६ ऑगस्ट रोजी पटेल हे नांदेड,लातूर व सोलापूर येथील पार्सल घेऊन सोलापूर पुणे महामार्गावरुन चारचाकीमधून मुंबईला जात होते.इंदापुर टोल नाक्याच्या पुढे वरकुटे पाटी येथे गतिरोधक जवळ गाडीचा वेग कमी केला. पहाटे अडीचच्या सुमारास सहा जणांनी पटेल यांच्या गाडीजवळ येत त्यांना रॉड दाखवत अडवण्याचा प्रयत्न केला.पटेल यांनी त्यांच्या गाडीचा वेग वाढून वेगात पुढे निघून गेले. त्यावेळी आरोपींनी दोन चारचाकी वाहनातून पटेल यांच्या गाडीचा सात ते आठ किमी पाठलाग केला. पटेल यांच्या स्कॉर्पिओ गाडीवर गोळीबार केला. त्या दरम्यान पाठलाग करणाऱ्या दुसऱ्या चारचाकी गाडीने पटेल यांच्या गाडीला आडवी मारुन फिर्यादी यांची गाडी थांबवली. आरोपींनी फिर्यादी व त्यांच्या सोबत असलेल्या विजयभाई सोलंकी यांना मारहाण करुन गाडीमधून खाली उतरवत दुसऱ्या गाडीत बसवले. त्यानंतर गाडीत ठेवलेली ३ कोटी ६० लाख २६ हजार रुपयांचा दरोडा टाकून चोरुन नेला.

या गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके यांनी तापासाच्या सूचना दिल्या. आरोपींचा शोध घेण्यासाठी तीन तपास पथके तयार करण्यात आली.तसेच इंदापुर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे यांनी स्वतंत्र तीन तपास पथके तयार केली.आरोपींचा सहा पथकाकडून तपास सुरु असताना हा गुन्हा सागर होनमाने याने त्याच्या इतर साथिदारांच्या मदतीने केल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली.पथकाने कुर्डुवाडी परिसरात आरोपींचा शोध घेऊन सागर होनमाने,ज्योतीम कदम आणि रजत मुलाणी यांना ताब्यात घेतले.त्यांच्याकडे केलेल्या सखोल चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली देऊन त्यांच्या इतर साथीदारांची माहिती दिली.पोलिसांनी होनमाने याच्याकडून ७२ लाख तर रजत मुलाणी याच्याकडून ७१ लाख २० हजार रुपये असा एकूण १ कोटी ४३ लाख २० हजार रुपये जप्त केले.अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून त्यांच्या इतर साथिदारांची माहिती मिळाली.त्यानुसार गुन्हे शाखा आणि पोलीस स्टेशन यांची प्रत्येकी एक असे दोन पथके राजस्थान येथे रवाना करण्यात आली.पथाकाने गौतम भोसले,किरण घाडगे, भुषण तोंडे या तिघांना प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून स्थानिक पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेतले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलींद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती विभाग गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके,पोलीस उपनिरीक्षक अमित सिद पाटील, पोलीस उपनिरीक्षक गणेश जगदाळे,सहा.फौजदार रविराज कोकरे,तुषार पंदारे,बाळासाहेब करांडे,पोलीस हवालदार सचिन घाडगे,अजय घुले,जनार्दन शेळके राजु मोमीण,विजय कांचन, असिफ शेख,अभिजीत एकशिंगे, स्वप्निल अहिवळे,पोलीस कर्मचारी अक्षय नवले,चालक प्रमोद नवले,होम.जयेश पाथरकर वालचंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार रविंद्र पाटमास,बारामती शहर पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार कल्याण खांडेकर, इंदापूर पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे,सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पवार,महेश माने,पोलीस उपनिरीक्षक सुधीर पांडुळे,पोलीस नाईक सलमान खान,पोलीस कर्मचारी विशाल चौधर,पोलीस हवालदार सुरेंद्र वाघ, मनोज गायकवाड, सचिन बोराडे,पोलीस नाईक मोहमंद अली मड्डी,बापु मोहीते,पोलीस कर्मचारी लक्ष्मण सुर्यवशी दिनेश चोरमले विनोद काळे,सुरज गुंजाळ यांनी केली. तसेच राजस्थान येथील प्रतापनगर पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक दर्शनसिंग राठोड, पोलीस हवालदार बुटी राम, गोविंद सिंग,रूद्रा प्रताप सिंग यांच्या पथकाने तपासाकामी मदत केलेली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *