इंदापूर : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
गेल्या काही दिवसापासून निरा डाव्या कालव्याच्या अस्तरणीकरणाच्या विरोधात बारामती मतदारसंघातील शेतकरी आक्रमक झाले असून निरा डाव्या कालव्याचे अस्तरीकरण होऊ नये अशी ठाम भूमिका घेतल्याने अस्तरीकरण तात्पुरत्या स्वरूपात थांबवण्यात आले आहे अशी माहिती प्रशासनाकडून मिळत आहे.मात्र कॅनल अस्तरीकरण ही संकल्पना चुकीची असून,या संकल्पनेमुळे हजारो शेतकरी व शेतमजूर यांची उपासमार होणार आहे. त्यामुळे हे अस्तरीकरण कोणत्याही परिस्थितीत होऊ द्यायचे नाही अशा बाबतचा ठराव बारामती तालुक्यातील ग्रामपंचायतीमधून घेण्यात येण्याची मोहीम शेतकऱ्यांकडून उघडली गेली आहे.
याच पार्श्वभूमीवर इंदापूर तालुक्यातील निंबोडी गावात सभा आयोजीत करण्यात आली होती.या सभेकरीता मोठ्या संख्येने शेतकरी व शेतमजूर उपस्थित होते. यावेळी निंबोडी ग्रामपंचायत ने देखील सिमेंट काँक्रिट अस्तरीकरणाविरोधात ग्रामसभेत ठराव मंजूर करून तो कॅनॉल बचाव समितीकडे सुपूर्त केला.जोपर्यंत संपूर्ण काम थांबणार नाही तो पर्यंत आंदोलन थांबणार नाही. अशी ठाम भूमिका शेतकऱ्यांकडून घेण्यात आली. यामध्ये ही चळवळ पक्षी विधी असून यामध्ये कोणीही राजकारण आणू नये.तसेच राजकिय नेते शेतकऱ्यांमध्ये फूट पाडण्याचे षडयंत्र करीत असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे.
कॅनॉल जवळील भागात आले की अस्तरीकरणाला पाठींबा आणि नदीकडील भागात गेले की विरोध ही भूमिका घेत आहेत. अस्तरीकरणाकरणापेक्षा नीरा नदी येणारे केमिकल बंद केले योग्य प्रकारे बंधारे बांधले तर त्या शेतकऱ्यांना १२ महिने पाणी मिळेल पण तस् न करता दुट्टपी भूमिका घेत असल्याचा आरोप पांडुरंग कचरे यांनी केला.शहरातील कॅनॉल अस्तरीकरण झाल्याने अनेक बोअर बंद पडले आहेत.त्यापेक्षा वाईट अवस्था शेतकऱ्यांची अस्तरीकरण केल्याने होणार आहे. असे पांडुरंग कचरे यांनी आवर्जून सांगितले.यामुळे या समितीच्या वतीने आंदोलनाची दिशा ठरविण्यात आली. यावेळी पांडुरंग कचरे,विक्रम कोकरे ,सतीश काटे, बाळासाहेब शिंदे,नारायण घोळवे,मनोज घोळवे,सर्जेराव घोळवे यांनी आपले विचार व्यक्त केले.