BIG NEWS : बारामती शहरातील दोन पेक्षा अधिक गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगारांना पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांचा सूचक ईशारा ; मळदमधील गुंड भोऱ्या जाधवला एम.पी.डी.ए.करत दिला सावधानतेचा ईशारा..!!


बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

बारामती शहरातील वाढती गुन्हेगारी लक्षात घेत,सराईत गुन्हेगारांवर कायद्याची धाक राहावी,शहरात कायदा सुव्यवस्था टिकून रहावी यासाठी बारामती शहर पोलिसांनी धडक मोहीम उघडली असून,बारामती शहरातील मळद गावातील सराईत गुन्हेगार आकाश उर्फ अक्षय उर्फ “भोऱ्या” जाधव यांच्यावर झोपडीपट्टी दादा प्रतिबंधक विरोधी कायद्यांव्ये कारवाई करत त्याला एका वर्षासाठी स्थानबद्ध करत बारामतीमधील सराईत गुन्हेगारांना मात्र पोलीस निरीक्षक सुनील महाडीक यांनी सुचकतेचा ईशारा दिला आहे.त्यामुळे दोनपेक्षा अधिक गंभीर गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगारांना धडकी भरल्याची चर्चा मात्र जोरदार सुरू झाली आहे.गेले दोन वर्षापासून बारामती तालुक्यातील मळद गावातील आकाश उर्फ अक्षय उर्फ भोऱ्या बापूराव जाधव वय.२७ वर्षे याच्यावर गुन्हे दाखल होऊनही शहरातील त्याची दहशत कमी होत नव्हती.

त्याच्यावर दरोडा,जबरी चोरी,खंडणी मालमत्तेची तोडफोड,नासधूस मारहाण शिवीगाळ,जीवे मारण्याची धमकी,चोरी,हत्यारा सहित लुटमार अशा प्रकारचे गुन्हे दाखल असून,देखील त्याच्यात सुधारणा होत नव्हती. आगामी निवडणुकांसाठी दहशत माजवण्यासाठी तो तयार असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली होती.दहीहंडी आयोजनावरून बराच वादंग निर्माण झालेला होता.याच अनुषंगाने पोलीस निरीक्षक सुनील महाडिक याचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांच्याकडे सादर केला त्यांनी.या प्रस्तावाचे अवलोकन करून परिपूर्ण असा प्रस्ताव जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्याकडे सादर केला.संशयित आरोपीचे रेकॉर्ड व परिसरातील त्याचा गुन्हेगारीचा आलेख व दहशत पाहता तात्काळ त्याला मंजुरी दिली आहे.

त्याला येरावडा मध्यवर्ती कारागृह या ठिकाणी एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आलेला आहे.या आरोपीचा परिपूर्ण प्रस्ताव पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख,अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते,बारामती उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक,सहा.पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ,युवराज घोडके पोलीस कर्मचारी देवेंद्र खाडे,संजय जगदाळे,दशरथ कोळेकर कल्याण खांडेकर,अतुल जाधव दशरथ इंगोले,संजय जाधव,प्रमोद राऊत,बंडू कोठे,तुषार चव्हाण,मनोज पवार चालक यशवंत पवार यांनी केलेली आहे

बातमी चौकट :

बारामती व परिसरातील गुंडांना हा सूचक इशारा आहे आपण वारंवार गुन्हे कराल आपल्या वर्तणुकीत सुधारणा होणार नसेल तर आपण या कायद्याप्रमाणे स्थानबद्ध व्हाल पूर्वी एखाद्या गुन्हेगाराने गुन्हा केला असेल आणि त्यासोबत एखाद्या नवीन युवकांनी भावनेच्या भरात सोबत जाऊन गुन्हा केला तर त्याला सुद्धा मोक्का सारख्या गंभीर गुन्ह्याची कारवाई होऊ शकते व जीवन उध्वस्त होऊ शकते.त्यामुळे दाखल होणाऱ्या कोणत्याही गुन्ह्याची कारवाई आपण हलक्यात घेऊ नका.

सुनील महाडीक ( बारामती शहर पोलीस निरीक्षक )


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *