BIG BREAKING : व्याजाच्या पैशासाठी फसवणूक करत जमिनीचे साठेखत करून घेण्याच्या नावाखाली खरेदीखत करत,परस्पर जमिनीचा व्यवहार करणाऱ्या खासगी सावकारावर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..!!


बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

मुलीच्या लग्नात झालेल्या खर्चामुळे पैशाची गरज असल्याने खासगी सावकाराकडून घेतलेल्या पैशासाठी तारण म्हणून घेतलेल्या जमिनीचे साठेखत करून घेतो असे सांगत खरेदीखत करून घेत फसवणूक केल्याप्रकरणी तसेच एक लाख मुद्देलेला वर्षाला तब्बल चाळीस हजार व्याज देऊनही अधिक पैश्याची मागणी करत तारण ठेवलेली जमीन परस्पर विक्री केल्याचा जाब विचारल्याने जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या एकावर बारामती तालुका पोलीस ठाण्यात भा.द.वि.कलम ४२०, ५०४,५०६,महाराष्ट्र सावकारी अधिनियम २०१४ चे कलम ३९,४५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धनंजय उत्तम बनकर ( रा.जराडवाडी,ता.बारामती,जि. पुणे ) असे गुन्हा दाखल झालेल्या खासगी सावकाराचे नाव आहे.याप्रकरणी छाया बाळासो जराड,वय.५० वर्षे रा.जराडवाडी,ता.बारामती,जि.पुणे यांनी फिर्याद दिली आहे.

याबाबत तालुका पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार,फिर्यादींच्या पतीने सन २०१५ साली मुलीच्या लग्नात झालेल्या खर्चामुळे संशयित आरोपी बनकर यांचेकडून १,००,००० रुपये घेतले होते.या रक्कमेला वर्षाला ४०,००० रुपये व्याज असे ठरणे असताना,यासाठी तारण म्हणून फिर्यादींच्या पतीच्या नावावर असलेल्या गट नं.३२५ मधील १७ गुंठे जागा साठेखतादवारे लिहुन देण्याचे ठरले होते.त्यानुसार २९ जुलै २०१५ रोजी फिर्यादींच्या पतीने मध्यस्थीच्या माध्यमातून साठेखत करून दिले.फिर्यादी हे अशिक्षित असल्याने त्यांनी संशयित आरोपी बनकरवर विश्वास ठेवला.परंतु काही दिवसानंतर फिर्यादीच्या मुलांनी दस्त वाचल्यानंतर संशयित आरोपींनी फिर्यादीकडून साठेखत करून घेण्याऐवजी खरेदीखत करून घेतल्याचे समजले.

त्यावेळी फिर्यादींनी त्यास खरेदीखतावर हरकत घेतली नाही.बनकर यांना व्याजाची रोख रक्कम ४०,००० दिले होते.त्यानंतर फिर्यादींची पैशांची अडचण असल्याने, त्यांनी बनकर यांना व्याज दिले नाही. त्यामुळे धनंजय बनकर यांनी व्याजासाठी फिर्यादीच्या नवऱ्याला हात पाय तोडत जीवे मारण्याची धमकी दिली.त्यानंतर
सन २०२२ ला बनकर यानी व्याजच्या पैशांसाठी तगादा लावला.सन २०१६ पासुन आजपर्यंत सहा वर्षाचे ५ लाख व्याज मागितले,जर व्याज दिले तरच तुमची जमीन परत देईन असे म्हणल्याने,त्यावेळी फिर्यादींनी
ठरल्याप्रमाणे व्याजाचे दोन लाख चाळीस हजार रूपये व मुददल एक लाख रूपये असे तीन लाख चाळीस हजार देण्यास तयार झाले असताना देखील,मला ५ लाख पाहिजेत असा अट्टहास बनकर यांनी धरला.

तुम्ही जर पसे दिले नाही तर जागा दुसऱ्या कोणाला तरी विकून टाकेल असे संगितले.त्यानंतर २८ जुलै २०२२ ला बनकर यांनी फिर्यादींची जमीन पुनम पाटोळे यांना विकली. फिर्यादींच्या पतीच्या अशिक्षितपणाचा फायदा घेत,एक लाख रुपयांच्या मोबदल्यात फिर्यादीची १७ गुंठे जमीन साठेखत करून घेतो असे सांगुन खरेदीखत करून घेत फसवणूक केली असून, जमिनीत विचारलं जेवणे बाबत विचारल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादींने फिर्यादीत महंटले आहे.या गुन्ह्याचा अधिक तपास तालुका पोलीस हे करीत आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *