BIG BREAKING : व्याजाच्या पैशासाठी घरात घुसून केला महिलेचा विनयभंग ; एकावर विनयभंगासह सावकारकीचा गुन्हा दाखल ; पोलिसांनी तत्परता दाखवत आरोपीला तात्काळ घेतले ताब्यात..!!


बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

वीट भट्टी व्यवसायासाठी दिलेल्या व्याजाच्या पैशावरून खाजगी सावकाराने घरात जात शिवीगाळ व दमदाटी करत तिचा विनयभंग केला. याप्रकरणी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात या खाजगी सावकाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे वडगाव निंबाळकर पोलिसांनी तत्परता दाखवत या खासगी सावकाराला तात्काळ ताब्यात घेतली आहे. संतोष दिनकर खोमणे ( रा. कोऱ्हाळे बुद्रुक,ता.बारामती जि.पुणे ) असे गुन्हा दाखल झालेल्या सावकाराचे नाव आहे.या खाजगी सावकाराला पोलिसांनी अटक केल्याची माहिती वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांनी दिली. याप्रकरणी कोऱ्हाळे बुद्रुक येथील ४४ वर्षीय पीडित महिलेने फिर्याद दिली आहे.

याबाबत वडगाव निंबाळकर पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार,पीडित फिर्यादींच्या पतीला संशयित आरोपी खोमणे याने वीटभट्टी व्यवसायाकरता एक लाख रुपये रुपये व्याजाने दिलेले होते.या मोबदल्यात फिर्यादींच्या पतीने संशयित आरोपीस वेळोवेळी व्याजाची रक्कम दिली होती असे असताना देखील संशयित आरोपी वारंवार फिर्यादींच्या घरी जाऊन व्याजाच्या पैशाची मागणी करीत होता.

काल रात्री संशयित आरोपीने फिर्यादीच्या घरी जात त्यांच्या मनास लज्जा उत्पन्न होइल असे वर्तन करत जवळ घेण्याचस प्रयत्न करत फिर्यादीला मारहाण केली.यावेळी फिर्यादींचे पती व पुतण्या फिर्यादीला सोडवण्याकरता आले असता संशयित आरोपीने त्यांना देखील शिवीगाळ व दमदाटी करत तुमचे खानदान शिल्लक ठेवणार नाही अशी धमकी देखील दिली.असे फिर्यादीने फिर्यादीत महंटले आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक योगेश शेलार हे करीत आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *