बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त ‘स्वराज्य महोत्सवाचे’ आयोजन करण्यात आले असून या महोत्सवाअंतर्गत बारामती येथील शारदा प्रांगण येथे सामुहिक राष्ट्रगीत गायन करण्यात आले.
यावेळी तहसीलदार विजय पाटील,मुख्याधिकारी महेश रोकडे,बारामतीचे उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे,उप अधिक्षक भूमी अभिलेख गणेश कराड,पोलीस निरीक्षक सुनील महाडिक,निवासी नायब तहसिलदार विलास करे यांच्यासह सर्व संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी, शिक्षक, विद्यार्थी, स्वातंत्र्य सैनिकांचे उत्तराधिकारी,नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी नगरपरिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीताचे गायन केले.