तिरंगा रंगाच्या टोप्या परिधान करून ५५०० विद्यार्थ्यांनी इंदापूर महाविद्यालयात केले ध्वजारोहण…
इंदापूर : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या येथील कला , विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सानिमित्त आज १५ ऑगस्ट रोजी कला,विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय इंदापूर नारायणदास रामदास हायस्कूल व जुनिअर कॉलेज इंदापूर,नारायणदास रामदास इंग्लिश मीडियम स्कूल इंदापूर,नारायणदास रामदास प्राथमिक विद्यामंदिर इंदापूर प्रशालेतील विद्यार्थ्यांनी तिरंगा रंगाच्या टोप्या परिधान करून ध्वजारोहण केले.संस्थेचे अध्यक्ष व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते यावेळी ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी माजी सैनिकांचा सत्कार हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते करून त्यांना सन्मानित करण्यात आले.स्वातंत्र्य दिनाच्या घोषणा देत तिरंगा रंगाच्या टोप्या परिधान करून विद्यार्थ्यांनी उत्साहपूर्ण वातावरण तयार केले होते.हर्षवर्धन पाटील म्हणाले की, प्रत्येकाने राष्ट्रप्रेम, राष्ट्रीय भावना,राष्ट्रीय एकात्मता घरोघरी जोपासून भारत देशाचे नाव उंचावले पाहिजे.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला राज्यघटना दिली.देशातील प्रत्येक नागरिकास समानतेचा व मतदानाचा अधिकार मिळाल्याने समानता आली.भारताने कृषी,औद्योगिक,हरित,धवल आणि तंत्रज्ञानाच्या क्रांतीच्या माध्यमातून सर्व क्षेत्रात सक्षमता निर्माण केलेली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कर्तुत्वाने आपला भारत देश जगामध्ये महासत्ता होण्यासाठी प्रयत्न करीत आहे.
प्रस्ताविकात प्राचार्य डॉ. जीवन सरवदे म्हणाले की,’ देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्यांनी हुतात्मा पत्करले तसेच योगदान देणाऱ्या महापुरुषांना मी प्रथम अभिवादन करतो. भारत देश हा जागतिक स्पर्धेमध्ये असून सर्व क्षेत्रात भारताने प्रगती केली.मेजर कैलास गवळी यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.ज्येष्ठ पत्रकार अतुल तेरखडकर,सहसचिव प्रा.बाळासाहेब खटके,निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील,इंदापूर अर्बन बँकेचे व्हाईस चेअरमन सत्यशील पाटील,मा.नगराध्यक्ष अशोक इजगुडे,माजी नगरसेवक शेखर पाटील, उपनगराध्यक्ष धनंजय पाटील,बापू जामदार यावेळी उपस्थित होते.क्रीडासंचालक डॉ.भरत भुजबळ यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.हायस्कूलचे मुख्याध्यापक विकास फलफले यांनी आभार मानले.