पुणे : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्युज नेटवर्क…
अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने आंबेगाव बु. पुणे येथील महेंद्रसिंग मनोहरसिंग यांच्या विकी कुमार बिल्डींग मधील गोदाम जवळील पेढीवर धाड टाकून २२ हजार रुपये किमतीचे ८८ किलो भेसळयुक्त तुप व ११ हजार ९६ रुपये किमतीचे ७३ किलो वनस्पती असा एकुण रुपये ३३ हजार ९६ चा साठा जप्त करण्यात आला आहे.
भेसळयुक्त पदार्थांचे नमुने विश्लेषणासाठी राज्य आरोग्य प्रयोगशाळा पुणे येथे पाठविण्यात आले आहेत. या प्रकरणी विक्रेत्याविरुद्ध तपासणीमध्ये आढळुन आलेल्या त्रुटीच्या अनुषंगाने तडजोड अर्ज दाखल करुन रुपये १० हजार तडजोड शुल्क वसूल करण्यात आले आहे. विश्लेषण अहवाल प्राप्त झाल्यानंतर अन्न सुरक्षा व मानदा कायदा २००६ अंतर्गत तरतुदीनुसार पुढील कारवाई घेण्यात येईल.
सह आयुक्त (अन्न) संजय नारगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त (अन्न) रमाकांत कुलकर्णी व अन्न सुरक्षा अधिकारी क्रांती बारवकर यांनी ही कारवाई केली.