बारामती नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाच्या हलगर्जीपणामुळे हा प्रकार घडल्याच्या चर्चेला उधाण….
बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
बारामती येथील खंडोबा नगरमधील भोई समाजातील काही लोकांनी वडार समाजातील काही कुटुंबांविरोधात बारामती नगरपरिषद व शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केल्याचा राग मनात धरत भोई समाजातील स्रियांना मारहाण झाल्याची घटना घडली घडली असून, मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून,याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात संशयित आरोपी सचिन हरिचंद्र पवार,बापू नाना पवार, प्रशांत हरिचंद्र पवार, अजय सुरेश पवार लाला गणपत पवार,गणेश काळे,भुऱ्या राजू पवार,लक्ष्मी लाला पवार,वैशाली पोपट पवार यांच्यावर शहर पोलीस ठाण्यात बेकायदा जमा जमवणे,मारहाण करणे,महिलांचा विनयभंग करणे जबरदस्तीने मोबाईल चोरून येणे,अल्पवयीन मुलीला लज्जास्पद मारहाण करणे अशा विविध कलमान्व्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की,संबंधित भोई समाजातील कुटुंबातील तक्रारदाराचे म्हणणे आहे की,ते राहत असलेल्या ठिकाणी वराह पालनाने होत असलेल्या परिसरात घाण आणि दुर्गंधी पसरत आहे.यामुळे आजू बाजूच्या रहिवाशांना या दुर्गंधीचा खूप त्रास होत आहे. तसेच या संदर्भात बारामती नगर परिषदेचे मुख्याधिकारी तसेच बारामती शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार अर्ज दाखल केला होता.पोलीस स्टेशनला दोन्ही पक्षकारांना बोलावून आपापसात वाद मिटवून घेण्यासाठी वेळ दिला होता.मात्र आज दोन्ही समाजामध्ये चर्चेतून वाद विकोपाला गेला.
वडार समाजातील पुरुषांनी भोई समाजातील महिलांना बेदम मारहाण केली आहे.या प्रकरणाला नक्की जबाबदार कोण ? कारण सदरील तक्रारी अर्जाच्या अनुषंगाने हा विषय बारामती नगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या होता मात्र बारामती नगरपालिकेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी आपली जबाबदारी झटकून तुम्ही पोलीस ठाण्याकडे तक्रार द्या असे सांगितल्याने तसेच मुख्याधिकारी रोकडे यांनी वेळीच पोलीस प्रशासनाच्या मदतीने कारवाई केली असती तर हा प्रसंगच ओढवला नसता.त्यामुळे आता तरी बारामती नगरपालिका आणि आरोग्य विभाग या तक्रारी अर्जाच्या अनुषंगाने कारवाई करणार का ? की अजून असा अशा घटना होण्याची वाट बघणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.