CRIME NEWS : बँक फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीस पोलीसांनी १० तासाच्या आत गुन्हयाची उकल करून ठोकल्या बेड्या; सातारा-औंध पोलिसांची धडाकेबाज कामगिरी..!!


सातारा : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा वडगांव ज.स्वा. ता. खटाव बँकेच्या खिडकीचे लोखंडी गज कापून बँकेचे आतमध्ये प्रवेश केला. तसेच गॅसकटरच्या सहाय्याने अज्ञात चोरटयांनी बँकेची तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केला.याबाबत माहिती प्राप्त होताच तात्काळ औंध पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.प्राप्त माहितीच्या आधारे गुप्त माहितीदार पेरून तपासाची चक्रे फिरवली.व संशयित आरोपी हर्षवर्धन हरिशचंद्र घार्गे,वय.२० वर्षे ( रा.शाहुनगर ता. जि. सातारा ) यश संजय घार्गे, वय.१९ वर्षे ( रा.दौलत नगर ता. जि. सातारा ) रूषीकेश सोमनाथ नागमल वय. २० वर्षे ( रा.वडगांव.स्वा.ता.खटाव जि.सातारा )यांना ताब्यात घेतले आहे.घटनास्थळी त्यांना १,९५,९०,४४१ रूपयाचा रोक रक्कम व सोने चांदीचे दागिण्याचा मुद्देमाल सुरक्षीत मिळून आला.याप्रकरणी औंध पोलीस ठाण्यात भा.द.वि. कलम ४५७,३८० ५११, ४२७ दाखल करण्यात आला.

औंध पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी डी.पी.दराडे यांनी पोलीसांच्या वेगवेगळया टिम बनवून सीसीटीव्ही व मोबाईल सीडीआर यांचे तांत्रिक माहितीवरून दोन संशयीत आरोपींना गुन्हयात वापरण्यात आलेली चार चाकी स्कॉरपीओ क्रमांक एम.एच. ०६ क्यू.८८८८ ही गाडीसह सातारा येथून ताब्यात घेतले. तसेच एका आरोपीस वडगांव ज.स्वा. ता. खटाव येथून ताब्यात घेण्यात आले.या गुन्हयातील तपासाचे अनुषंगाने गोपनीय बातमीदाराचे मदतीने व सीसीटीव्ही फुटेज चेक करून व मोबाईल सीडीआर यांचे तांत्रिक माहितीवरून गुन्हयातील अज्ञात आरोपीचा शोध घेत ताब्यात घेण्यात आले.या संशयित आरोपींना गुन्हयाच्या कामी १० तासाच्या आत जेरबंद करण्यात आले आहे.

ही कारवाई सातारा पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल,अप्पर पोलीस अधीक्षक अजित बो-हाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी दहिवडी कॅम्प वडूज निलेश देशमुख यांच्या मार्गदर्शनासाखाली सहा.पोलीस निरीक्षक डी.पी.दराडे,पोलीस उपनिरीक्षक गंगाप्रसाद केंद्रे,सपोफी जाधव,पोलीस नाईक राहुल सरतापे, पोलीस कॉन्स्टेबल राहुल जाधव,पोलीस कॉन्स्टेबल किरण हिरवे,पोलीस कॉन्स्टेबल महेश जाधव यांच्या पथकाने केलेली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *