दौंड : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
दौंड शहरातील इदगा मैदान परिसरात गोहत्या करून गोमांस विक्रीसाठी घेऊन जाणाऱ्या परिसरात छापा मारत एकाला ताब्यात घेत,चौघांवर दौंड पोलीस ठाण्यात भा.द.वि.कलम ४२९,३४ गोवंश हत्या (सुरक्षा) महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुधारणा कायदा १९९५ चे कलम ५ , ५ (क ),९ (अ) भारतीय प्राणी संरक्षण कायदा कलम ११ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी धंद्याचा मूळ मालक इद्रिस अबिद कुरेशी (रा. कुरेशी गल्ली दौंड ) किरण पांडुरंग कुंभार (रा.शिंदेवाडी,ता. माळशिरस,जि.सोलापूर),मुश्रीफ कुरेशी,बबलू कुरेशी ( रा.मुजावरवाडा,बारामती) किरण पांडुरंग कुंभार,वय. २२ वर्षे (रा.शिंदेवाडी,ता.माळशिरस,जि.सोलापूर ) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.या कारवाईत दोघेजण अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले आहेत.याबाबत दौंड पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक आमिर जिलाणी शेख यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत दौंड पोलिसांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार बारामती विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांना दौंड परिसरातील खाटीक गल्लीमधील ईदगाह मैदान परिसरातील कत्तलखान्यात इद्रिस कुरेशी हा जनावरांची कत्तल करून त्यांचे गोमांस विक्री साठी पाठविणार असल्याची गोपनीय बातमीदारांमार्फत माहिती मिळाल्याने उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांनी दौड पोलिसांना कारवाईचे आदेश दिले असता,दौंड पोलिसांनी तात्काळ छापा टाकला असता, संशयित आरोपी पळून जाऊ लागल्याने,पोलिसांनी एकाला जागीच पकडले,व इतर पळून जाण्यात यशस्वी झाले. ज्याठिकाणी पकडले त्या ठिकाणी कत्तल केलेल्या गायीच्या मासांचे तुकडे व सात जिवंत जनावरे मिळून आली.यामध्ये प्रामुख्याने ६३७ किलो अंदाजे ८२,८१० किमतीचे जनावरांचे मांस , ७०,००० रुपये किंमतीच्या ४ जरश्या गायी,१ जर्शी बैल, २ गावराण गायी,अंदाजे ५०,००० किंमतीची सेंट्रो गाडी क्र.एम.एच.१५.ए.एच ९४५८ तसेच २,००,००० किंमतीची मारूती कंपनीची रिट्स गाडी क्र. एम.एच.१२. जी.एफ.५२६७,एक लोखंडी धारधार सत्तुर व एक धारदार सुरी असा एकूण ४,०२,९१० रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून,दौंड पशुवैद्यकीय अधिकारी घटनास्थळी हजर झाले.त्यानी मांसाची पाहणी केली.आणि हे
मांस सॅम्पल करीता जागीच सिल करत मांस नगरपरिषदेकडील कर्मचारी याचे मदतीने जप्त करत
नगरपालिकेच्या जागेमधील कचरा डेपो येथे नष्ट करण्यात आले आहे.तसेच गायांना गोशाळेत जमा केले आहे.असे फिर्यादीने फिर्यादीत महंटले आहे.
ही कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख,अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, बारामती उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे,दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे, पोलीस उपनिरीक्षक सुनिता चवरे पोलीस कर्मचारी विकास गावडे, पांडुरंग थोरात,महेंद्र लोहार, निखिल जाधव,अमीर शेख, रवींद्र काळे,योगेश गोलांडे, सुरेश चौधरी यांच्या पथकाने कारवाई केली.