BIG BREAKING : बारामती मधील तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कायदा- सुव्यवस्था ढासळत आहे का ? पुन्हा एकदा बारामतीत भरदिवसा ३८ वार करत भावाने केला भावाचा खून..!!


बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

बारामती तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत जिल्हा सहा महिन्यापासून दोन खून झाले असून तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ढासळत आहे का ? असा प्रश्न तालुक्यातील नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. यापूर्वीही एमआयडीसी मधील एका हॉटेलमध्ये आचाऱ्याचा खून झाल्याची घटना घडली होती. आज घडलेल्या घटनेमुळे तालुक्यातील खळबळ उडाली आहे.बारामती तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रुई परीसरात सख्ख्या मावस भावाने भरदिवसा मावस भावावर तब्बल ३८ वार करीत निर्घृण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. गजानन पवार,वय २८ वर्षे मुळ (रा.वसमत,जि.हिंगोली ) सध्या रूई बारामती)असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे.ही घटना सोमवारी दुपारी १२ च्या सुमारास रुई शासकीय रुग्णालयाच्या पाठीमागील बाजुस घडली आहे.

याबाबत मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार हत्या करण्यात आलेल्या युवकावर ताबाब ३८ वार झाल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले असून,तालुका पोलिसांनी आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही तपासणी केली असता,कोणतेही धागेदोरे हाती लागले नसल्याने, पोलिसांनी अधिक चौकशी केली असता मयत गजानन हा सलून दुकानात काम करतो.त्याच्या सोबत त्याचा मावस भाऊ संतोष हा देखील काम करीत असून,तो सतत नशेत असल्याची माहिती देखील पोलिसांना मिळाली. याबाबत पोलिसांनी अधिक शोध घेतला असता संशयित आरोपी संतोष हा सीसीटीव्ही फुटेजमध्ये जाताना दिसला.त्यामुळे पोलीसांनी तात्काळ बारामती बसस्थानक,रेल्वे स्थानकाच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांचे पथक पाठवत संशयित आरोपी संतोषला पकडण्यासाठी शोधमोहिम राबवत असता, कटफळ रेल्वे स्थानकावर संतोष दिसला असता,त्याने तेथून पळ काढला असता पोलिसांनी मोठ्या शिताफीने त्याला ताब्यात घेतले.

ही कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख,अप्पर पोलीस अधिक्षक बारामती मिलिंद मोहीते उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती उपविभाग गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश ढवाणे,सपोनि योगेश लंगुटे, महिला सपोनि आश्विनी शेंडगे,पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय लेंडवे, सहा. फौजदार मंत्रे,अविनाश गायकवाड,कल्याण शिंगाडे, पोलीस हवालदार राम कानगुडे,रमेश भोसले,सुरेश साळवे,सुरेश दडस,राजेंद्र जाधव, पोलीस नाईक अमोल नरूटे,राजेंद्र काळे,पोलीस कर्मचारी दत्तात्रय मदने, शशिकांत दळवी, दौंड रेल्वे गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस हवालदार वाघमारे,घुले, दौंड पोलीस स्टेशन येथील पोलीस हवालदार शिंदे यांनी केलेली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *