पुणे : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
पुणे जिल्हा परिषदेच्या गटांच्या आरक्षण सोडतीमध्ये आजी माजी पदाधिकाऱ्यांसाठी ‘कभी खुशी, कभी गम’ अशीच स्थिती निर्माण झाली आहे.जिल्हा परिषदेचे विद्यमान अध्यक्षा निर्मला पानसरे उपाध्यक्ष रणजित शिवतारे, विरोधीपक्ष नेते शरद बुट्टे पाटील यांना पुन्हा सभागृहात जाण्याची संधी मिळाली आहे. तर माजी बांधकाम सभापती प्रमोद काकडे देविदास दरेकर,माजी कृषी सभापती सुजाता पवार यांच्यासह काही पदाधिकाऱ्यांची संधी हुकली आहे.
पुणे जिल्हा परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठीची आरक्षण सोडत गुरुवारी जाहीर करण्यात आली. जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांच्या उपस्थितीत सोडत काढण्यात आली.यावेळी जिल्हा परिषद निवडणूक शाखेचे समन्वयक, उपजिल्हाधिकारी संजय तेली, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी कार्यालयातील कारकून विनायक राऊत आदी उपस्थित होते.जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वास देवकाते यांचा गट हा अनुसूचित जाती महिलासाठी राखीव झाला आहे, तर माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांचा गट हा सर्वसाधारण महिलासाठी राखीव झाल्याने त्यांना धक्का बसल्याचे मानले जात आहे आहे. या सोडतीतून जिल्हा परिषद गटांचे चित्र आता स्पष्ट झाले आहे.
यांची संधी हुकली…
पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष पांडुरंग पवार, शरद लेंडे, माजी बांधकाम सभापती प्रमोद काकडे, प्रवीण माने, माजी कृषी सभापती सुजाता पवार, बाबुराव वायकर, मावळत्या सभागृहातील शिवसेनेचे गटनेते देविदास दरेकर आदींचे आरक्षण सोडतीमध्ये यांचे गट राखीव झाल्याने त्यांना पुन्हा संधी मिळणार नाही.