बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
बारामती पंचायत समितीच्या १४ गणांची आरक्षण सोडत गुरुवारी काढण्यात आली. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार लोकसंख्येच्या उतरत्या क्रमानुसार सोडतीत आरक्षण निश्चित करण्यात आले. तालुक्यात पाच जागा सर्वसाधारण आहेत.
सुपा, शिर्सूफळ, काटेवाडी, वाघळवाडी व निंबुत हे गण सर्वसाधारण गटासाठी आरक्षित झाले आहेत. पणदरे, मुढाळे, मोरगाव, डोर्लेवाडी हे गण सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाले आहेत.काऱ्हाटी व निरावागज हे दोन गण नागरिकांच्या मागास प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित झाले आहेत. तर गुणवडी गण अनुसुचित जातीसाठी, वडगाव निंबाळकर गण अनुसुचित जातीच्या महिलेसाठी तर सांगवी गण नागरिकांचा मागास प्रवर्ग यासाठी आरक्षित झाला आहे.
या सोडत कार्यक्रमास उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, तहसिलदार विजय पाटील, गट विकास अधिकारी डॉ.अनिल बागल, निवासी नायब तहसिलदार विलास करे, तहसिल कार्यालयातील कर्मचारी, नागरिक आदी उपस्थित होते.