पुणे : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील ६ पोलीस स्थानक हद्दीतील एकूण २९ शस्त्र परवानाधारकांकडील शस्त्रे संबंधित पोलीस स्थानकाला जमा करण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी दिले आहेत.शस्त्रपरवाना धारकांनी आदेश प्राप्त होताच ताबडतोब व कोणत्याही परिस्थीतीत सात दिवसाच्या आत शस्त्र जमा करावीत.
बारामती तालुका पोलीस स्थानक हद्दीतील ९,वाचलंदनगर पोलीस स्थानक हद्दीतील ३, इंदापूर पोलीस स्थानक हद्दीतील १, शिरुर पोलीस स्थानक हद्दीतील ११, हवेली पोलीस स्थानक हद्दीतील ५ असे २९ शस्त्रपरवाना धारकांकडील शस्त्र जमा करुन घेण्याबाबत आदेशात नमूद करण्यात आले आहे. शस्त्र जमा करताना शस्त्रे ज्या स्थितीत होती त्या स्थितीतच धारकास जमा कालावधीनंतर परत केली जातील. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय दंड संहिता कलम १८८ मधील तरतूदीनुसार कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमूद केले आहे.