दौंड : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
स्वामी चिंचोली गावच्या हद्दीत असणाऱ्या हॉटेल हिंदवी चालवायला घेत,हॉटेलमध्ये वेश्याव्यवसाय सुरू केल्याचे समजल्याने तुम्ही हॉटेलवर असला व्यवसाय चालवू नका असे सांगितले असताना देखील वेश्याव्यवसाय सुरू असल्याचे माहीत झाल्याने तुम्ही हॉटेल चालवू नका आणि तुमचे डिपॉझिटचे पैसे घेऊन जावा असे म्हणत हॉटेल बंद केल्याचा राग मनात धरत हात पाय तोडत मारण्याची धमकी दिली.तसेच माझा व्याजाचा धंदा आहे तू मला हॉटेल सोडायला लावले,व माझ्या वापरलेल्या पैश्याचे व्याज दे नाहीतर जीव मारून उजनी धरणात फेकून देईल अशी धमकी देणाऱ्या भिगवणमधील संशयित आरोपी नामदेव बंडगर (रा.मदनवाडी,भिगवण, ता.इंदापूर) याच्यासह त्याच्या साथीदारांवर दौंड पोलीस ठाण्यात भा.द.वि कलम ४५४,३८० (३४) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत योगेश सूर्यकांत शितोळे यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत दौंड पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार,7फिर्यादींनी शहाजान शेख यांचे हॉटेल भाडे करारावर चालवण्यासाठी घेतले असताना,यातील संशयित आरोपी नामदेव बंडगर हे फिर्यादींकडे वारंवार जात व माझ्या हॉटेल व्यवसायासाठी मला जागा अपुरी पडत असून, तुमचे हॉटेल मला चालवायला द्या,परंतु फिर्यादींनी त्याला नकार देत दिला.त्यावेळी संशयित आरोपींनी मी तुम्हाला तुमचे असेल ते डिपॉसिट व तुमचे भाडे देतो असे म्हणत,त्यांनी फिर्यादींना डिपॉसिट म्हणून सात लाख देत,हॉटेलमधील सर्व सेटअप मी वापरनार व त्याचे भाडे म्हणून दर महिन्याला तीस हजार रुपये भाडे देतो.असे ठरले असताना बंडगर यांनी दि.०५ मे २०२२ रोजी हॉटेलवर रोख पैसे दिले.व त्यानंतर फिर्यादींना एकाही महिन्याचे भाडे दिले नाही.
त्यानंतर शितोळे यांना आपल्या हॉटेलवर बंडगर हे वेश्याव्यवसाय चालवीत असल्याची माहिती मिळाली असता,त्यांनी बंडगर यांना हॉटेलवर असले धंदे करू नका असे सांगितले असता, बंडगर यांनी फिर्यादींना उडवा उडवीची उत्तरे दिल्याने शितोळे यांनी हॉटेलला टाळे टोकल्याने त्याचा राग मनात धरून बंडगर यांनी शितोळे यांच्या हॉटेलवर येत हॉटेल बंद पडण्यास भाग पाडले आणि फिर्यादींच्या खडकी येथील हॉटेलवर मदनवाडी येथिल तानाजी रणदिवे व एक अनोळखी व्यक्ती यांनी शितोळे यांच्या हॉटेल मधील कामगारांना हात पाय तोडून जीवे मारण्याची धमकी देत निघून गेले.
त्यानंतर शितोळे १४ जुलै २०२२ रोजी हॉटेलची पाहणी करण्यासाठी गेले असता, त्याठिकाणी नामदेव बंडगर हे आले व शितोळे यांना म्हणाले की,माझा व्याजाचा धंदा आहे तु मला हाँटेल सोडायला सांगितले व माझे पैसे वापरले त्याचे व्याज दोन लाख दहा हजार व हॉटेलला लावलेल्या बोर्डाचे पाच लाख दे नाहीतर,मी तुला उजनी धरणात मारून टाकुन देत जीवे मारण्याची धमकी दिल्याने त्याच्या भीतीपोटी फिर्यादींनी हॉटेल व्यवसाय बंद केला.त्यानंतर २१ जुलै रोजी फिर्यादींच्या भावाचा फोन आला की हॉटेलचे शटर उघडे आहे.व काहीजण हॉटेलचे साहित्य ट्रक्टर व टेम्पोमध्ये भरीत आहेत.व संशयित आरोपी नामदेव बंडगर देखील त्याठिकाणी आहेत. फिर्यादींनी हॉटेल गेले असता हॉटेलचे शटरला उघडे दिसून आल्याने हॉटेल मधील तब्बल २ लाख ६१ हजारांचे साहित्य चोरीला गेल्याचे निदर्शनास आल्याने फिर्यादींनी दौंड पोलीस ठाण्यात धाव घेतली असे फिर्यादींनी फिर्यादीत म्हंणटले आहे.या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस कर्मचारी राउत हे करीत आहेत.