महाराष्ट्र न्यूज टुडे न्यूज :मुख्यसंपादक विकास कोकरे
महाराष्ट्र टाईम २४ न्यूज वृत्तवाहिनीचा संपादक असल्याचे सांगून OLX व इतर ऑनलाईन वेबसाईटवर विक्रीसाठी कारचे फोटो टाकून बारामती मधील एमआयडीसीतील,इंदापूरमधील बेलवाडीमधील जोडप्याने तब्बल चार लाखांची फसवणूक केली. याप्रकरणी बारामती शहर पोलिसांनी महेश मच्छिंद्र कदम (वय.३१ वर्ष रा.काटी,तुळजापूर उस्मानाबाद रा.देसाईवस्ती,ता. इंदापूर,बेलवाडी जि. पुणे )यास अटक केली आहे.तर याच प्रकरणात प्रियांका पांडुरंग जाधव (रा.बारामती जि.पुणे हिच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यासंदर्भात बारामतीत अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते,उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर व पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,प्रियांका जाधव यांच्या नावावर असलेल्या मारुती सुझुकी कंपनीची वॅगनार (क्रमांक एच 13 DI 7333) या कारची विक्री करण्यासाठी ओएलएक्स या ऑनलाईन वेबसाईटवर फोटो आणि माहिती अपलोड केली. कार खरेदी करायची असल्याने फिर्यादीने बारामती येथे येऊन माहिती घेतली.तेव्हा कदम याने त्याच्याकडील या कारमध्ये बसवून गाडीची ट्रायल दिली व गाडीची कागदपत्रे दाखवली.त्यानंतर फिर्यादी व कदम यांच्यामध्ये या गाडीचा व्यवहार पाच लाख रुपये किमतीला ठरला.त्यातील चार लाख रुपये त्याच दिवशी व उरलेली एक लाख रुपये रक्कम ही गाडी खरेदी ची सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर देण्याचे ठरले.त्यानंतर प्रियांका जाधव हिच्या अक्सिक्स बँक शाखा सोलापूर येथील खात्यावर फिर्यादीने चार लाख रुपये ट्रान्स्फर केले.त्यानंतर फिर्यादी व साक्षीदाराला गाडी मध्ये बसवून कदम याने बारामती येथील नवीन प्रशासकीय भवन शेजारील झेरॉक्स सेंटरमध्ये नेऊन गाडीच्या व्यवहाराची नोटरी करण्यास सुरुवात केली.थोड्या वेळानंतर कदम याने फिर्यादीला प्रियांका जाधव हिला सही करण्यासाठी घेऊन येतो,असे सांगून त्या ठिकाणावरून वाहनासह तो निघून गेला.त्यानंतर त्याच्या फोनवर अनेक वेळा फोन लावले.परंतु त्याने फोन उचलले नाहीत.दरम्यान प्रियांका जाधव हिच्या खात्यावर जमा केलेल्या रकमेसंदर्भात कोणीही फोन उचलत नव्हते.त्यामुळे या दोघांनी संगनमताने ही फसवणूक केली असल्यावरून ही फिर्याद दाखल करण्यात आली.
दरम्यान या बंटी बबली वर यापूर्वी देखील गुन्हे दाखल असून मी टाईम 24 न्यूज महाराष्ट्र वृत्तवाहिनीचा संपादक आहे असे सांगून कदम हा विश्वासात घेऊन लोकांची फसवणूक करीत असल्याचे दिसून आले आहे.या दोघांवर मुंबईतील डोंगरी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला असून,जेल रोड पोलिस स्टेशन,सोलापूर सोलापूर तालुका पोलीस स्टेशन या ठिकाणी दोन गुन्हे दाखल आहेत.दरम्यान यासंदर्भात आरोपीने अन्य कोणाची फसवणूक केली असल्यास त्यांनी बारामती तालुका पोलीस बारामती शहर पोलीस ठाण्यात तक्रार द्यावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख,अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते,उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती पोलिस निरीक्षक नामदेव शिंदे,फौजदार गणेश निंबाळकर,सहा.फौजदार शिवाजी निकम,बापू बनकर, दशरथ इंगोले,तुषार चव्हाण,अकबर शेख व सायबर क्राईमचे पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील सुनील कोळी व चेतन पाटील यांनी केली.