बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
बारामती शहर पोलीस ठाण्यास संध्याकाळची वेळ दिवसभराचे काम आटोपून हजेरी घेण्याच्या तयारीत असताना काही पत्रकार मित्रांनी पोलीस स्टेशनला कळवले की बारामती एसटी स्टँड जवळ दोन वर्ष तीन वर्ष चार वर्ष सहा वर्ष वयाची काही मुले असुरक्षित असून त्या ठिकाणी त्यांच्या जीवाला धोका होऊ शकतो त्या ठिकाणी दोन पुरुष त्या मुलांना दोघांकडे बळजबरीने घेऊन जात आहेत आणि त्यांची आई ही गरोदर आहे.
आणि सदरचे लोक काही महिन्यापासून हे रोड कडेलाच राहत आहेत त्यांच्या जीवास धोका होऊ शकतो असे कळवल्याने पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी तात्काळ त्या ठिकाणी पोलीस वाहन पाठवून संबंधित लोकांना पोलीस ठाण्यास आणले असता त्या ठिकाणी चौकशींत असे समजले की या महिलेचे पूर्वी लग्न झालेले असून त्यापासून त्या महिलेला चार अपत्य झालेली आहेत.तिच्या पतीबरोबर तिचे पटत नसल्याने ही महिला चार मुलांसह त्या पतीला काही महिन्यापूर्वी सोडून बारामतीमध्ये आली होती.
बारामतीमध्ये एका व्यक्तीसोबत ती पुलाखाली रोड कडेला राहत होती व भिक मागून खात होती आणि त्या व्यक्तीपासून सुद्धा तिला परत दिवस गेले होते आणि ती गरोदर आहे सदर महिलेच्या पहिल्या पतीस ही गोष्ट समजल्यानंतर तो काल बारामती मध्ये आला आणि तिचा पहिला पती व ती सध्या ज्या सोबत राहत आहे तो व्यक्ती (मानलेला पती )यांच्यामध्ये मारामारी सुरू होती आणि त्या ठिकाणी पहिला पती त्या मुलांना बळजबरीने घेऊन चाललेला होता दोन्ही इसम हे दारूच्या नशेमध्ये होते चार मुले व ते लोक रस्त्याच्या कडेला वास्तव्य करणारे आहेत त्या लोकांना बेसिक आरोग्य तसेच राहण्याची सुविधा नसल्याने पोलिसांनी कायदेशीर सल्ला घेतला व सदर महिला व ते दोन्ही पुरुष हे त्या मुलांची ताबा मागत असताना सुद्धा त्यांच्यापासून त्यांना धोका होऊ शकतो हे ओळखले आणि त्या महिलेला व चार आपत्त्यांना पोलिसांनी प्रेरणा वस्तीग्रह बारामती या ठिकाणी दाखल केलेला आहे.
जेणेकरून त्यांच्या जीवितास धोका निर्माण होणार नाही. सदर मुले ही लहान असल्याने परंतु ती आई सोबत राहत असल्याने त्यांना प्रेरणा वस्तीग्रहाच्या संत मॅडम यांनी सुद्धा राहण्याची परवानगी दिलेली आहे. पत्रकारांनी कळवल्यामुळे अतिशय संवेदनशील पणे हे प्रकरण पोलिसांना इतर ताण असताना सुद्धा त्यांचे पुनर्वसन केलेले आहे वेळ पडल्यास सदर आईने जर परवानगी दिली तर त्या चारही मुलांना ती जर सांभाळण्यास सक्षम नसेल तर बाल कल्याण समिती पुणे यांच्यासमोर हजर करून या मुलांना बालसुधारकात ठेवण्यात येणार आहे परंतु अद्याप पर्यंत तिच्या आईने अजून परवानगी दिली नसल्याने आईच सुरक्षित असल्याने तिला प्रेरणा महिला वसतिगृहात ठेवण्यात आलेले आहे.ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक घोडके,पोलीस कर्मचारी दशरथ कोळेकर यांनी केली आहे.
चौकट बातमी :
समाजातील तळागाळातील लोकांना पोलीस स्टेशन मध्ये आल्यानंतर कायदेशीर मार्गाने आश्रय देण्याबाबत बारामती पोलीस ठाण्यातील सर्व अधिकारी कर्मचारी यांना प्रशिक्षित केलेले आहे.त्यामुळे जर अशाप्रकारे महिला,मुले जर निराश्रीत मिळून आली,किंवा त्यांना आधाराची गरज असेल तर पोलिसांना डायल ११२ वर किंवा चाइल्ड हेल्पलाईन नंबर १०९१ वर तात्काळ कळवावे.असे आवाहन शहर पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी बारामतीकरांना केले आहे.