बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात एका दोन वर्षीय मादी जातीच्या चिंकारा हरिणाचा मृत्यू झाल्याची घटना दि.१८ रोजी बारामती तालुक्यातील मुढाळे येथील चिकनेपाटी पासून काही अंतरावर घडली आहे.याबाबत सविस्तर हकीकत अशी की,मुढाळे येथील युवक सागर चिकणे हा कॉलेजसाठी बारामतीच्या बाजूला जात असताना सकाळी कुत्र्यांच्या हल्ल्यात चिंकारा जातीचे हरीण जखमी झाल्याचे निदर्शनास आले.सागरने कुत्र्यांना पिटाळून लावण्याचा प्रयत्न केला. पण कुत्र्यांची संख्या जास्त असल्याने ते एकट्याला शक्य झाले नाही.अशातच सागरने दलित पँथर बारामती तालुकाध्यक्ष शंतनु साळवे यांच्याशी संपर्क केला.
त्यांनी कसलाही विलंब न लावता वनपरिक्षेत्र अधिकारी शुभांगी लोणकर यांनी घटनेची माहिती दिली. वनरक्षक वैभव कंक हे घटनास्थळी दाखल झाले. पण हरीण गंभीररित्या जखमी झाले होते. त्यामुळे उपचारापूर्वीच ते मृत पावले. शिवविच्छेदन करण्यासाठी पणदरे येथे नेण्यात आले.त्यानंतर पणदरे येथील वनविभाग हद्दीत त्यावर अंतिम संस्कार करण्यात आले.गेल्या काही दिवसापासून भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात चिंकारा जातीच्या हरीण जखमी झाल्याची घटना घडल्या आहेत. पोल्ट्री व्यावसायिक मेलेल्या पक्षांची योग्य विल्हेवाट लावत नसल्याने भटकी कुत्री वाढत आहेत.या भटक्या कुत्र्यांनी परिसरातील शेळ्या मेंढ्या गाई यांच्यावर देखील हल्ला केल्याचे बोलले जात आहे.मात्र अजून किती हरणांचा जीव गेल्यानंतर वनविभाग भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करेल असा सवाल वन्यजीव प्रेमी यांनी केला आहे.