इंदापूर : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
इंदापूर पोलिसांनी पुणे सोलापूर महामार्गांवर सरडेवाडी टोलनाका येथे रात्रीच्या नाकाबंदी दरम्यान अवैद्य विमल गुटख्याने भरलेला ट्रक इंदापूर पोलिसांनी पकडला असून या कारवाईत गुटख्यासह तब्बप ९० लाख २३ हजार ९२० रुपयांचा एकूण मुद्देमाल जप्त केला आहे. त्यानुसार गाडी चालक व मालक यांच्याविरोधात इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की,शनिवारी रात्री अकरा वाजण्याचा सुमारास नाकाबंदी दरम्यान सोलापूर बाजूकडून पुण्याच्या दिशेने जात असणारा ट्रक ( के.ए २८ बी ९८३१ ) हा संशयास्पद वाटल्याने इदापूर सरडेवाडी टोलनाका येथे थांबवून चौकशी केली असता महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटख्याच्या १६७ गोण्या मिळून आल्या.त्यानुसार जवळपास ६८ लाख २३ हजार ९२० रुपये किंमतीचा गुटखा व २२ लाखांचा रुपयांचा वाहतूक करणारा ट्रक असा एकूण ९० लाख २३ हजार ९२० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.या गुन्ह्याचा अधिक पुढील तपास इंदापूर पोलीस करीत आहेत.
ही कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक टी.वाय.मुजावर, सहा.पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर धनवे,महेश माने,पोलीस उपनिरीक्षक सुधीर पाडुळे,पोलीस हवालदार काशिनाथ नागराळे,पोलीस नाईक मोहम्मद अली मड्डी,बापू मोहिते, जगदीश चौधर,सुनील नगरे,मनोज गायकवाड,महेंद्र पवार पोलीस शिपाई दिनेश चोरमले,लक्ष्मण सूर्यवंशी, सुनील बालगुडे,वैभव मदने,महेश गोसावी आदींनी केली आहे.