इंदापूर : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
इंदापूर तालुक्यातील बावडा गायरान हद्दीत केलेल्या अतिक्रमणाच्या तक्रारीचा राग मनात धरुन पत्रकाराला जातीवाचक शिवीगाळ करत,गुंडामार्फत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला असून, याप्रकरणी संशयित आरोपी संजय सूरचंददास पारेख, प्रदीप सुरचंददास पारेख,पारेख सूरचंददास पारेख, सोनाली परेश पारेख या चौघांविरोधात इंदापूर पोलीस ठाण्यात भा.द.कलम ५०४,५०६ (३४),नागरी हक्क संरक्षण अधिनियमचे कलम ७ (१) (d) ,अनुसूचित जाती आणि जमाती ( अत्याचार प्रतिबंधक )अधिनियम १९८९ चे कलम ३ (१) (r) ,३ (१) (s) ,३ (२) (va) विविध कलमांन्व्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत पत्रकार उमाकांत रमाकांत तोरणे,वय.५१ वर्षे ( रा. बावडा,ता.इंदापूर,जि. पुणे ) यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत इंदापूर पोलिसांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार,फिर्यादी तोरणे हे गेल्या काही वर्षांपासून पत्रकार म्हणून कार्यरत आहेत.फिर्यादींनी त्यांच्या घराजवळ गायरान गट नं.१४३० मध्ये सहा गुंठे जागेवर संशयित आरोपींनी कब्जा करून त्यामध्ये पत्रा शेड बनविले असुन,हे अतिक्रमण करण्याचा वेळेस त्या जागेमध्ये लक्ष्मण जाधव यांचा उकीरडा असल्याने त्यांनी अतिक्रमणास विरोध केला असता आरोपींनी जाधव याला मारहाण केली असता,त्याबाबत इंदापुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून फिर्यादींनी या अतिक्रमणा बाबत ग्रामपंचायतीला तक्रारी अर्ज केल्याचा राग मनात धरून आहेत.
फिर्यादी व त्यांचा मित्र बळीराम सुर्यवंशी हे सकाळी ११.०० वाजण्याच्या सुमारास बावडा भांडगाव रोडवर थांबलेले असताना,संशयित आरोपी हे फिर्यादींजवळ जात म्हणाले की,माझे पुण्यातील गँगवारशी संबध असून,केलेल्या अतिक्रमणाची तक्रार मघारी घे ,नाहीतर तुझ्या पुतण्याचा जसा मर्डर झाला तसा तुझा ही मर्डर करुन टाकीन अशी धमकी देत जातीवाचक शिवीगाळ केली.झालेल्या प्रकाराने फिर्यादी घाबरुन गेल्याने त्यांनी याबाबत वाचत्या केली नाही.त्यानंतर १४ जुलै रोजी सकाळी आरोपी हे फिर्यादींच्या घराशेजारील एकाला शिवीगाळ दमदाटी करीत होते,त्यावेळी फिर्यादींनी भांडणे करु नका असे समजावुन सांगितले असता, संशयित आरोपींनी तू आमच्या मध्ये पडू नकोस तुझा ते कायमचा बंदोबस्त करणार आहे,असे म्हणत फिर्यादींना जातीवाचक शिवीगाळ केली.असे फिर्यादीनी फिर्यादीत महंटले आहे.या गुन्ह्याचा अधिक तपास बारामती विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे हे करीत आहेत.