BIG BREAKING : शेअर मार्केटमधील गुंतवणुकीचे आमिष दाखवून तब्बल ३७ जणांना ४ कोटींना घातला गंडा ; सिंहगड रोड पोलिस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल..!!


पुणे : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतविल्यास त्यावर दरमहा ५
टक्के दराने परतावा मिळेल,असे आमिष दाखवून एकाने ३७ गुंतवणुकदारांना तब्बल ४ कोटी १० लाख ८३ हजार रुपयांना गंडा घातला आहे.याप्रकरणी नितीन वसंत अनासपुरे,वय.५१ वर्षे (रा. सदाशिव पेठ) यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.त्यानुसार पोलिसांनी माधव कुमारील भागवत (वय ५८, रा. शारदा हेरिटेज,सावित्रीनगर, हिंगणे खुर्द) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.हा प्रकार सिंहगड रोडवरील आकांक्षा क्रिएशन्स येथे मे २०२१ ते जानेवारी २०२२ दरम्यान घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,माधव भागवत याने सिंहगड रोडवर कार्यालय सुरु केले. शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतविल्यास त्यावर दरमहा ५ टक्के दराने परतावा मिळेल किंवा शेअर मार्केटमध्ये गुंतविलेल्या रक्कमेवर मिळणाऱ्या नफ्यामध्ये ६० टक्के गुंतवणुकदार याची आणि ४० टक्के त्यांची भागीदारी असे आमिष दाखविले.तसेच शैलजा कमर्शिअलमध्ये १३५
दिवसांसाठी गुंतवणुक केल्यास त्यावर दुप्पट रक्कम मिळेल,अशा योजना सांगून लोकांना गुंतवणुक करण्यास भाग पाडले.

या आमिषाला बळी पडून नितीन अनासपुरे यांनी त्यांची आई, सासरे यांच्या नावाने २ लाख रुपयांची गुंतवणुक केली. त्यांच्यासह आणखी ३७ जणांनी अशाच प्रकारे ४ कोटी १० लाख ८३ हजार ७२५ रुपयांची गुंतवणुक केली.त्यांना आजपर्यंत कोणतीही रक्कम परत न करता त्यांची फसवणुक केली असल्याचे फिर्यादींनी फिर्यादीत महंटले आहे.या गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक वैरागकर हे करीत आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *